पंढरपूरात चंद्रभागा बसस्थानक आणि प्रवासी निवास इमारतीचे लोकार्पण, प्रवाशांना मिळणार या सुविधा

पंढरपूरातील चंद्रभागा बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांसह पंढरपूर येणाऱ्या भाविकांच्या निवासाची सोय देखील होणार आहे. भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या भव्य बसस्थानकाचे आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर लोकार्पण झाले.

पंढरपूरात चंद्रभागा बसस्थानक आणि प्रवासी निवास इमारतीचे लोकार्पण, प्रवाशांना मिळणार या सुविधा
chandrbhaga bus stationImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jul 17, 2024 | 6:59 PM

एसटी महामंडळाच्या महत्वाकांक्षी अतिभव्य अशा चंद्रभागा यात्रा बसस्थानक आणि प्रवासी तसेच यात्रेकरू निवासस्थानाचे लोकार्पण आज करण्यात आले. एसटीचे हे पहिलाच अशा प्रकाराचा प्रकल्प असून येथून राज्यातील सर्व मार्गावर बसेस सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. या पंढरपूरातील आषाडी एकादशीचा मुहूर्त साधून या चंद्रभागा बसस्थानक आणि प्रवासी निवास इमारतीचे आज भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या यात्रेकरुन निवासात भाविकांची अल्पदरात निवासाची सोय होणार आहे. तसेच 500 एसटी कर्मचाऱ्यांच्या निवासाची देखील व्यवस्था होणार आहे.

आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी एसटी महामंडळाकडून आपल्या 11 हेक्टर जागेवर 34 फलाटाचे अति भव्य चंद्रभागा यात्रा बस स्थानक निर्माण करण्यात आले आहे. तसेच  पंढरपूरला दररोज येणाऱ्या भाविक- यात्रेकरूंच्या निवासाची अल्प दरात सोय व्हावी या दृष्टीने बस स्थानकाला लागूनच यात्री निवास बांधण्यात आले आहे. या यात्री निवासामध्ये 500 एसटी कर्मचारी तसेच एकाच वेळी सुमारे 1 हजार यात्रेकरुंची निवासाची सोय होणार आहे. एसटी कर्मचारी व यात्रेकरूंसाठी 2 सुसज्ज उपहारगृहे देखील बांधण्यात आली आहेत. राज्यात एसटी महामंडळाचा हा पहिलाच प्रकल्प असून त्यासाठी एकूण 33 कोटी रुपये खर्च आले आहेत.

काय आहेत सुविधा

या बसस्थानकात वाहतूक नियंत्रण कक्ष, आरक्षण कक्ष, पुरुष आणि महिला तसेच  दिव्यांगाकरीता स्वतंत्र विश्रांतीगृह आणि प्रसाधनगृह, हिरकणी कक्ष, आपला दवाखाना, जेनेरिक औषधालय, पार्सल कक्ष, पोलीस मदत केंद्र, वातानुकूलित प्रतीक्षालय, प्रशस्त वाहनतळ, दोन उद्वावाहक आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या बस स्थानकावरून  राज्यात सर्व ठिकाणी एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना याचा लाभ होणार आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.