CORONA | नवी मुंबईत ICU बेड्सची संख्या वाढवा, मनसेचं पालिका आयुक्तांना पत्र
नवी मुंबईत आयसीयू बेड्सची संख्या वाढवावी अशी मागणी मनसेने केली (Increase ICU Beds for Corona Patient In Navi Mumbai) आहे.
नवी मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत कोरोना रुग्णांसाठी आयसीयू बेड्सची कमतरता भासत आहे. त्यानुसार नवी मुंबईत बेड्सची संख्या वाढवावी अशी मागणी मनसेने केली आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांना याबाबत लेखी पत्र लिहिलं आहे. (Increase ICU Beds for Corona Patient In Navi Mumbai MNS demand)
मनसे विभाग अध्यक्षांच्या पत्रानुसार, सानपाडा येथील एमजीएम तसेच एमपीसिटी रुग्णालय हे महापालिकेने कोविड सेंटर म्हणून घोषित केले आहे. सध्या नवी मुंबईत कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. कोविड रुग्णांची संख्या दररोज वाढतच चालली आहे. अनेक कोविड रुग्ण हे उपचारासाठी एमजीएम तसेच एमपीसिटी रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे या दोन्ही रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी आयसीयू बेड्स कमतरता जाणवत आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांनी मनसे नेत्यांकडे केल्या होत्या.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
या तक्रारींच्या अनुषंगाने या दोन्ही रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी आयसीयू बेड्सची संख्या वाढवावी. याबाबतची व्यवस्था तातडीने करण्याची मागणी आज (8 जुलै) मनसेचे विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी पालिका आयुक्तांना ई-मेल पाठवून लेखी पत्राद्वारे केली.
अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात ‘मनसे स्टाईल’ ने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे विभाग अध्यक्षांनी दिला आहे. (Increase ICU Beds for Corona Patient In Navi Mumbai MNS demand)
शिवबंधन-घड्याळ-शिवबंधन, चार दिवसात पारनेरच्या पाच नगरसेवकांबाबत काय-काय घडले? https://t.co/pxhytzm0yg #Parner #Matoshree @OfficeofUT @AjitPawarSpeaks #Shivsena #UddhavThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 8, 2020
संबंधित बातम्या :
औरंगाबादमध्ये दोन दिवसात दोघा शिवसेना नगरसेवकांचा कोरोनाने मृत्यू
मुंबईत डॉक्टरांच्या प्रिस्कीप्शनशिवाय कोरोनाची चाचणी शक्य, ‘या’ खासगी लॅबमध्ये टेस्टिंगला परवानगी