Mumbai | मुंबईत कोरोनासह साथीच्या आजाराच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ, महापालिकेने दिल्या महत्वाच्या सूचना!

| Updated on: Jun 15, 2022 | 8:36 AM

राज्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, त्यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना रूग्ण आहेत. त्यामध्ये आता साथीचे रोग देखील हातपाय पसरवण्यास सुरूवात करत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. ज्या परिसरामध्ये डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रोची लागण नागरिकांना होते आहे, अशा ठिकाणीची पाहणी आणि किटकनाशक फवारण्याचे काम महापालिकेकडून केले जाते आहे.

Mumbai | मुंबईत कोरोनासह साथीच्या आजाराच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ, महापालिकेने दिल्या महत्वाच्या सूचना!
Image Credit source: indiatoday.in
Follow us on

मुंबई : मान्सूनपूर्व पावसाने मुंबईसह (Mumbai) राज्यामध्ये जोरदार हजेरी लावली. मात्र, आता पावसानंतर साथीच्या रोगांची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे. यामध्ये मुख्य: डेंग्यू आणि मलेरियाच्या रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसते आहे. मुंबईतील वरळी, कुर्ला, धारावी आणि माहीम परिसरामध्ये तर गॅस्ट्रो, डेंग्यू आणि मलेरियाचे रूग्ण (Patient) सतत वाढताना दिसत आहेत. इतकेच नव्हेतर स्वाईन फ्लूचा देखील एक रूग्ण मुंबईमध्ये सापडला आहे. या साथीच्या रोगांपासून दूर राहण्यासाठी घरामध्ये किंवा घराच्या परिसरामध्ये पाणी साचवू नका, असे आवाहन महापालिका (Municipal Corporation) प्रशासनाकडून सातत्याने केले जाते आहे. डेंग्यूचे डास चांगल्या पाण्यामध्ये राहतात. यामुळेच शक्यतो पाणी साचू नका असे सांगितले जात आहे.

साथीच्या रोगांच्या रूग्णांमध्ये वाढ

राज्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे, त्यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोना रूग्ण आहेत.आता साथीचे रोग देखील हातपाय पसरवण्यास सुरूवात करत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. ज्या परिसरामध्ये डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रोची लागण नागरिकांना होते आहे, अशा ठिकाणीची पाहणी आणि किटकनाशक फवारण्याचे काम महापालिकेकडून केले जाते आहे. मान्सूनपूर्व पाऊस चांगला झाल्याने अनेक ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. याच पाण्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचे डास उत्पत्ती होत असल्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाच्या रूग्ण संख्येमध्ये वाढ होते आहे.

हे सुद्धा वाचा

महापालिकेने डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी दिल्या सूचना

डेंग्यू आणि मलेरियाच्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी महापालिकेकडून काही सूचना नागरिकांना सांगण्यात आल्या आहेत. त्यामध्ये घरामध्ये साचवलेले पाणी दोन ते चार दिवसांमधून काढून टाका. त्यानंतर पाणी साचवलेल्या वस्तू चांगल्या धूवुन काही वेळ उन्हामध्ये ठेवा. त्यानंतर परत पाणी भरू शकता. आपल्या परिसरामध्ये शक्यतो जास्त पावसाचे पाणी साचणार नाही, यासाठी काळजी घ्या. डेंग्यूच्या डासावर पांढऱ्या रंगाचे डाग असतात. हा डास आपल्याला चावणार नाही, यासाठी उपायोजना करा. घरामध्ये आणि घराच्या परिसरामध्ये शक्यतो स्वच्छता ठेवा. यामुळे साथीचे रोग रोखण्यास नक्कीच मदत होईल.