Mumbai Corona : मुंबईत उच्चभ्रु वस्तीत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या हॉट स्पॉट ठिकाणं
corona update : दोन वर्षापुर्वी कोरोनाने महाराष्ट्रासह इतर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर हाहाकार उडाला होता. आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकार देखील सुरूवातीच्या काळात हादरून गेले होते.
मुंबई – कोरोनाने (Corona) पुन्हा डोकेवरती काढल्याने आरोग्य विभाग (Department of Health) आणि पोलिस प्रशासन दास्तावले आहेत. मागील अनेक दिवसांपासून कोरोनाची रूग्णसंख्या वाढायला लागल्याने आरोग्याची काळजी घ्या, तसेच मास्क वापरा असं आवाहन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्रातल्या (Maharashtra) अनेक प्रमुख शहरात कोरोनाची रूग्ण संख्या वाढत असल्याने आम्हाला कठोर निर्णय घ्यायला भाग पाडू नका असं देखील वक्तव्य महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अनेकांनी धास्ती घेतली आहे. परिस्थिती हाताबाहेर जायला लागल्यास तात्काळ नवी नियमावली लागू करणार असल्याचं मंत्र्यालयाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
उच्चभ्रु वस्ती कोरोनाचे हॉट स्पॉट
अंधेरी पश्चिम, ग्रॅण्ड रोड, वांद्रे पश्चिम, या उच्चभ्रु भागात कोरोनाचे रूग्ण सध्या अधिक सापडायला लागले आहेत. त्यामुळे उच्चभ्रु वस्ती कोरोनाची हॉट स्पॉट असल्याचे पालिकेकडून जाहीर करण्यात आले आहे. सध्याच्या स्थितीत अंधेरी 584 रूग्ण असल्याची माहिती मिळाली आहे. तर ग्रॅण्ट रोडमध्ये चारशेच्या आरपास रूग्णसंख्या, वांद्रे भागात साडेतीनशे रूग्णसंख्या आहे. त्यामुळे मुंबईतील उच्चभ्रु वस्ती कोरोनाची हॉट स्पॉट बनली असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. एप्रिल महिन्यात कोरोनाची तिसरी लाट पुर्णपणे संपुष्टात आली होती. त्यामुळे राज्य सरकराकडून लागू केलेली सगळी नियमावली मागे घेण्यात आली होती. तसेच परिस्थिती हाताबाहेर गेल्यास पुन्हा मास्कसह इतर नियमांची अंमलबजावणी पुन्हा करावी लागेल असे सुतोवाच राज्य सरकारने केले आहे.
आरोग्य यंत्रणेकडून काळजी घेण्याचे आवाहन
दोन वर्षापुर्वी कोरोनाने महाराष्ट्रासह इतर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर हाहाकार उडाला होता. आरोग्य यंत्रणेसह राज्य सरकार देखील सुरूवातीच्या काळात हादरून गेले होते. नेमकं काय करावं कुणाल सुचतं नव्हतं. त्यामध्ये अनेक लोकांचा उपाचारा अभावी मृत्यू झाला. ही परिस्थिती संपुर्ण देशात होती. महाराष्ट्रात कडक नियमावली असल्याने कोरोनाच्या संख्या आटोक्यात ठेवण्यात आरोग्य यंत्रणेला यश आलं होतं.
सध्या रूग्णांची संख्या वाढत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.