आदर्श शिक्षक पुरस्कारांची संख्या आणि बक्षीसाची रक्कम वाढवा; महापौरांचे निर्देश

महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन सभागृहात आयोजित समारंभात आदर्श शिक्षख पुरस्कार प्रदान करण्यात आले.

आदर्श शिक्षक पुरस्कारांची संख्या आणि बक्षीसाची रक्कम वाढवा; महापौरांचे निर्देश
Follow us
| Updated on: Sep 07, 2021 | 7:17 PM

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची वाढणारी संख्या व शिक्षकांची गुणवत्ता लक्षात घेता पुरस्कार प्राप्त शिक्षकांची संख्या ही 50 वरून 75 करणे तसेच पुरस्काराची मिळणारी रोख रक्कम ही 10 हजारावरून 25 हजार रुपये करण्यात यावी, असे निर्देश मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी दिले. (Increase the number of teachers awards and prize money; Mayor Kishori Pednekar’ instructions)

50 आदर्श शिक्षकांना 2020-21 चे आदर्श शिक्षक महापौर पुरस्कार

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज (07 सप्टेंबर) भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विन सभागृहात आयोजित समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी पुरस्कार प्राप्त शिक्षकांना मार्गदर्शन करताना महापौर बोलत होत्या. 50 पुरस्कार प्राप्त शिक्षकांना 10 हजार रूपये ईसीएसद्वारे, प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह तसेच शाल आणि श्रीफळ देऊन महापौर व इतर मान्यवरांच्या हस्ते‍ यावेळी गौरविण्यात आले.

याप्रसंगी उप महापौर अॅड. सुहास वाडकर, शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी, बाजार व उद्यान समिती अध्यक्षा प्रतिमा खोपडे, सह आयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, शिक्षण समिती सदस्य अल्नास झकेरिया, साईनाथ दुर्गे, मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य निखील जाधव, संचालक (प्राणीसंग्रहालय) डॉ. संजय त्रिपाठी, शिक्षणाधिकारी राजू तडवी तसेच सर्व उप शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

पुरस्कारासाठी पात्रतेचा निकष चुकीचा

महापौर किशोरी पेडणेकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, शिकण्याची प्रक्रि‍या ही जीवनाच्या अंतापर्यंत सतत सुरु राहणारी प्रक्रिया असून बृहन्मुंबई महानगरपालिका गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासोबतच विद्यार्थी भविष्यकाळात ज्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय करतील त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामातून आपली ओळख निर्माण करावी, असा मौलिक सल्लाही महापौरांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. त्याचप्रमाणे पुरस्कारासाठी पात्रतेचा निकष हा सेवानिवृत्त होण्यापूर्वी दोन वर्ष सेवा शिल्लक असणे हा निकष चुकीचा असून सहा महिने सेवा शिल्लक असलेल्या शिक्षकांचा सुद्धा पुरस्कारासाठी विचार करावा, असे निर्देशही महापौरांनी यावेळी दिले. त्यााचप्रमाणे पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन करुन ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाला नाही त्या शिक्षकांना पुढच्या वर्षी पुरस्कार मिळण्याच्या सदिच्छा महापौरांनी यावेळी व्यक्त केल्या.

प्रत्येक शिक्षकाने एक तरी आयएएस विद्यार्थी घडवावा

शिक्षण समितीच्या अध्यक्षा संध्या दोशी यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, पुरस्कारांमुळे शिक्षकांच्या जबाबदारीमध्ये आणखी वाढ झाली असून प्रत्येक शिक्षकांनी आपल्या सेवा काळामध्ये एक तरी आय. ए. एस. विद्यार्थी घडवावा, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनामुळे सीबीएसई बोर्डाच्या नवीन 10 शाळा सुरू करण्यात आल्या असून या दहा शाळांच्या चार हजार जागांसाठी दहा हजार अर्ज प्राप्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले. माझे शालेय शिक्षण सुद्धा महापालिका शाळेमध्ये झाले असल्याचा अभिमान आहे. पुरस्का‍र प्राप्त शिक्षकांचे त्यांनी अभिनंदन केले.

इतर बातम्या

अनधिकृत मासेमारीला पायबंद घालण्यासाठी सरकारचं पाऊल, 5 नवीन अत्याधुनिक वेगवान गस्तीनौका

बाप्पाची आरती, गणपती बाप्पा मोरयांचा गजर, टाळ-मृदुंगाच्या गजरात ‘मोदी एक्सप्रेस’ कोकणाकडे रवाना

मेहबूब शेखसारखे बलात्कारी मोकाट, त्यामुळे विकृतांना बळ, वानवडी बलात्कार प्रकरणावरुन चित्रा वाघ संतापल्या

(Increase the number of teachers awards and prize money; Mayor Kishori Pednekar’ instructions)

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.