INDIA alliance meet : भाजपचा डाव उधळण्यासाठी ‘इंडिया’ची मोठी खेळी, शरद पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी? काय घडणार उद्या?

इंडिया आघाडीची आज बैठक होत आहे. दोन दिवस ही बैठक चालणार आहे. या बैठकीला देशातील 28 पक्षाचे नेते एकत्रित जमणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

INDIA alliance meet : भाजपचा डाव उधळण्यासाठी 'इंडिया'ची मोठी खेळी, शरद पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी? काय घडणार उद्या?
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 31, 2023 | 9:13 AM

मुंबई | 31 ऑगस्ट 2023 : आज आणि उद्या महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडणार आहेत. या घडामोडींचे परिणाम केवळ महाराष्ट्रावरच नव्हे तर संपूर्ण देशावर होणार आहेत. विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची दोन दिवस मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. इंडिया आघाडीच्या निवडणूक रणनीतीपासून ते आघाडीचा लोगो आणि संयोजकपदावर या बैठकीतच निर्णय होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर इंडिया आघाडीकडून मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडिया आघाडीची आज बैठक होत आहे. आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांसाठी डिनरचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी इंडिया आघाडीच्या लोगोचे प्रकाशन होण्याची शक्यता अधिक आहे. तसेच उद्या इंडिया आघाडीची सकाळीच महत्त्वाची बैठक होणार आहे. त्यात इंडिया आघाडीच्या पुढच्या स्टॅटेजीवर चर्चा होणार आहे. या बैठकीला एकूण 28 पक्षाचे नेते उपस्थित राहणार असल्याने या बैठकीत कोणते निर्णय होतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संयोजकपद पवारांना?

दरम्यान, इंडिया आघाडीच्या संयोजक पदावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. संयोजकपदासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं नाव आघाडीवर आहे. हे दोन्ही नेते या पदासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. तर या पदासाठी शरद पवार यांच्या नावावरही शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार यांचं नाव इंडिया आघाडीतील काही घटक पक्षाकडून पुढे केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार हे पद घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवार पद स्वीकारणार?

उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीत संयोजकपदावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत शरद पवार यांचं नाव संयोजकपदासाठी पुढे केलं जाण्याची शक्यता आहे. पण शरद पवार हे या पदासाठी उत्सुक आहेत का? असा सवाल केला जात आहे. शरद पवार हे पद घेतील की नाही याबाबत पवारांकडून कोणतेही संकेत आलेले नाहीत.

मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांचे सर्वच राजकीय पक्षांशी सलोख्याचे संबंध आहेत. शरद पवार यांचे तर सत्ताधारी पक्षांशीही सलोख्याचे संबंध असल्याने पवार यांच्याकडे संयोजकपदाची धुरा जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

सेकंड फळीतील नेत्याकडे जबाबदारी?

दरम्यान, मध्यंतरी इंडिया आघाडीतील पद सेकंड फळीतील नेत्याला देण्याची चर्चा सुरू होती. पक्षप्रमुख हे निवडणुकीच्या रणनीती आणि सभांमध्ये व्यस्त असतात. तिकीट वाटपातही हे नेते व्यस्त असतात. त्यामुळे त्यांच्याकडे संयोजक पद दिल्यास ते या पदाला किती वेळ आणि न्याय देऊ शकतील याबाबतची शंका असल्याने सेकंड फळीतील नेत्यावर ही जबाबदारी देण्याची मध्यंतरी चर्चा सुरू होती. त्यावरही या बैठकीत खल होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.