Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDIA Alliance | चार समित्या स्थापन, रणनीती ठरली, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेतून मोठी बातमी

इंडिया आघाडीची मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीनंतर इंडिया आघाडीकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती देण्यात आली.

INDIA Alliance | चार समित्या स्थापन, रणनीती ठरली, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेतून मोठी बातमी
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 4:31 PM

मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : इंडिया आघाडीची मुंबई दोन दिवसीय बैठक आयोजित करण्यात आली होती. मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीच्या आयोजन महाविकास आघाडीकडून करण्यात आलं. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी या बैठकीच्या आयोजनाचं नेतृत्व केलं. या बैठकीनंतर इंडिया आघाडीची बैठक पत्रकार परिषद पार पडली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी बैठकांमध्ये काय-काय निर्णय घेतले याबद्दल थोडक्यात माहिती दिली.

“काल रात्र आणि आज दुपारी तीन वाजेपर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाली. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे इंडिया आघाडीची 14 सदस्यीय समन्वय समिती स्थापन करण्यात आलं आहे. त्यानंतर कॅम्पेन कमिटी, वर्किंग ग्रुप ऑफ सोशल मीडिया, वर्किंग ग्रुप ऑफ मीडिया आणि वर्किंग ग्रुप ऑफ रिसर्च या चार समितींची देखील स्थापना करण्यात आली आहे. सर्व पक्षांचे नेत्यांचा या कमिटींमध्ये समावेश करण्यात आला आहे”, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

समन्वय समितीचे सदस्यांची नावे

  • केसी वेणुगोपाल, काँग्रेस
  • शरद पवार, राष्ट्रवादी
  • टीआर बालू, डीएमके
  • हेमंत सोरेन, झारखंड मुक्ती मोर्चा
  • संजय राऊत, शिवसेना ठाकरे गट
  • तेजस्वी यादव, आरजेडी
  • अभिषेक बॅनर्जी, टीएमसी
  • राघव चढ्ढा, आप
  • जावेद अली खान, समाजवादी पार्टी
  • ललन सिंह, जनता दल युनायटेड
  • डी राजा, सीपीआय
  • ओमर अब्दुला, नॅशनल कॉन्फरन्स
  • मेहबुबा मुफ्ती, पीडीपी
  • सीपीआयच्या एका नेत्याचं नाव लवकरच जाहीर करणार, असं संजय राऊत यांनी सांगितलं

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

इंडिया मजबूत होत आहे. आम्ही एकत्र येतो तर एक-एक पावलं पुढे जात आहोत. त्यामुळे विरोधकांना धडकी भरत आहेत. इंडियाच्या विरोधी कोण ते सर्वांना माहिती आहे. आजच्या बैठकीत चांगली चर्चा झाली. काही समितींची स्थापना केली. येणाऱ्या लढाईत तानाशाही, भ्रष्टाचारच्या विरोधात लढू. आम्ही मित्र, परिवारवादाच्या विरोधातही लढू. भारत माझं कुटुंब आहे. ही लढाई तीव्र होत जाईल.

एक भीती आहे. एक विशेष अधिवेशन बोलावलं आहे. आम्ही लोकांना विश्वास देतो की, भयमुक्त भारतासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत. तुम्ही सर्व पाहत आहात की, कसा अत्याचा होत आहे. सिलेंडरचे दर कमी झाले पण याआधी भाव किती वाढले. पाच वर्ष लूट केली आणि निवडणुकीच्यावेळी सूट. अनेक मुद्दे आहेत आम्ही एकत्र होऊन लढू. इंडिया आणि भारताला आम्ही जिंकून देऊ. आपल्या सर्वांची ही लढाई आहे.

मल्लिकार्जुन खर्गे काय म्हणाले?

आजची बैठक खूप चांगल्याप्रकारे झाली. या बैठकीचा उद्देश काय होता ते उद्धव ठाकरे यांनी सांगितला आहे. आम्ही यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहोत. मी जेव्हा बंगळुरुत होतो तेव्हादेखील जी बैठक झाली होती, त्याआधी पाटण्यातही बैठक झाली होती. त्याआधी माझ्या घरी तयारीसाठी बैठक पार पडली होती. सर्व नेत्यांनी मिळून चर्चा केली. त्यानंतर पाटण्यात पहिली बैठक पार पडली. त्या बैठकीत अजेंडा तयार करण्याचं ठरलं. मग बंगळुरुत बैठक झाली.

मुंबईत सर्वांनी आपापलं मत मांडलं. सर्वांना महागाई कमी करायची इच्छा आहे. बेरोजगारीविरोधात लढायचं आहे. मोदीजी नेहमी १०० रुपये वाढवतात आणि २ रुपये कमी करतात. पेट्रोल, गॅसचे जे दर डबल झाले आहेत. पण त्यांनी फक्त २०० रुपये कमी केले. पण त्यांनी गरिबांकडून चोरी करुन लाखो रुपये कमवले. त्यानंतर लोकांना दाखवायला २०० रुपये कमी करायचे आणि सांगायचं आणि गरिबांसाठी काम करतो.

ते गरिबांसाठी कधीच काम करणार नाहीत. ते गरिबांच्या विरोधात काम करतात. मोठमोठ्या उद्योगपतींसोबत ते काम करतात. राहुल गांधींनी कालच एक रिपोर्ट आपल्यासमोर ठेवला होता. ७५ हजार कोटी गरिबांचे पैसे त्यांच्या खिशात कसा गेला हे सांगितलं. गरिबांचा जो पैसा जात आहे ते थांबवण्यासाठी इंडिया जिंकायला हवं. त्यासाठीच सर्वजण या मंचावर बसले आहेत.

आम्ही ठराव मांडला आहे. त्यानुसार काम करु, प्रत्येक राज्यात जाणार, बैठक घेणार. बेरोजगार, महागाईचा मुद्दा मांडू. ईडी, सीबीआय सारख्या यंत्रणांचा चुकीचा वापर केला जातोय. शरद पवार यांच्यानंतर माझा नंबर लावतो. मी ५५ वर्षांपासून राजकारणात आहे. मी असं कधी पाहिलं नाही. मी असा पंतप्रधान पाहिला नाही. विरोधकांना न बोलवता त्यांनी विशेष अधिवेशन बोलावलं.

मणिपूर जळत असताना विशेष अधिवेशन बोलावलं नाही. चीन जमीन हडप करत आहे, कोरोना संकट होतं, नोटबंदीच्यावेळी लोक अडचणीत होते तेव्हा त्यांनी विशेष अधिवेशन बोलावलं नाही. त्यांचा आजचा अजेंडा काय आहे ते मला माहिती नाही. ते हळूहळू हुकूमशाहीच्या दिशेला जात आहे.

मीडिया त्यांच्यासोबत आहे, असं त्यांना वाटतं. आम्हाला कधीकधी तसं दिसतं देखील. तुम्ही रागात आमच्याविरोधात लिहू नका, माफ करा. पण तुमचे हात त्यांनी बंद केले. हुकूमशाहीच्या दिशेने ते जात आहे. आम्ही त्यांच्या विचारधारेविरोधात लढण्यासाठी एकत्र आले आहोत. त्यांचा भ्रष्टाचार हा खूप मोठा आहे. पण कॅगच्या अहवालात भ्रष्टाचार दिसलाय. ते म्हणतात न खाऊंगा न खाने दुँगा, पण ते खाऊ देत आहेत. त्यामुळे यांच्याविरोधात लढाईचं आहे.

पुढची बैठक कुठे ठेवायची याबाबत आम्ही ठरवू. ते घाबरवण्याचा प्रयत्न करणार. पण आम्ही घाबरणार नाहीत. महाविकास आघाडीने आम्हाला बोलावलं, उद्धव ठाकरेंनी नेतृत्व केलं. हा कार्यक्रम यशस्वी झाला. मी मविआच्या सर्व नेत्यांचे धन्यवाद मानतो. खोटं बोला पण रेटून बोला, असं मोदीचं काम आहे. त्यांच्या कृत्य आपल्याला उघड करायचे आहेत.

नितीश कुमार काय म्हणाले?

निवडणूक वेळेच्या आधी देखील होऊ शकतो. आम्ही त्यामुळे चर्चा केली. सर्वांना जबाबदारी वाटून दिली आहे. केंद्रात असणारे हरणार आणि घरी जाणार.

अरविंद केजरीवाल काय म्हणाले?

आमची बैठक खूप चांगली आहे. सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने भूमिका निभवण्याची जबाबदारी घेतली आहे. आमच्यात खूप चांगल्या पद्धतीने समन्वय आहे. कुणाचाच कुणाशी वाद नाही. खूप चांगल्या पद्धतीने सर्व काही सुरु आहे. त्यामुळे या अंहकारी सरकारचं नक्कीच पतन होणार.

राहुल गांधी काय म्हणाले?

आम्ही दोन मोठ्या गोष्टी ठरविल्या आहेत. हा मंच 60 टक्के नागरिकांचं प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे भाजपला पुढची निवडणूक जिंकणं कठीण आहे. आम्ही समन्वय समिती स्थापन केलीय. त्या समितीतही काही समिती स्थापन केल्या आहेत. तर दुसरा निर्णय आम्ही लवकरच जागा वाटपाचा निर्णय घ्यायचा घेतलाय. निवडणूक आहे हे स्पष्ट आहे. मी काल पत्रकार परिषद घेतली होती.

स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?
त्याचं नाव जरी घेतलं तरी माझ्या जिभेला लकवा.., रामराजेंचा रोख कोणावर?.
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला
तुम्ही तर योजना बंद करायला कोर्टात गेले होते..; अजितदादांचा टोला.
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं
दगडफेक प्रकरणानंतर आरएसएस आक्रमक; डोंबिवलीतील वातावरण तापलं.
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत..
'लाडकी बहीण'वर दादाचं मोठं वक्तव्य; योजनेत दुरूस्ती होणार, पैसे परत...
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?
औरंगजेब कबरीचा वाद; संभाजीनगरचे जिल्हाधिकारी काय म्हणाले?.
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने...
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने....