भारतीय जहाजावर कोणी केला ड्रोन हल्ला, अमेरिकेने घेतले या देशाचे नाव

CGS Vikram | केमिकल वाहतूक करणाऱ्या भारतीय जहाजावर ड्रोन झाला होता. या हल्ल्यात जहाजाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हल्ला झालेला हे केमिकल टँकर असणारे जहाज मुंबईतील समुद्रकिनारी दाखल झाले आहे. नौदलाकडून संपूर्ण जहाजाची तपासणी करण्यात येत आहे.

भारतीय जहाजावर कोणी केला ड्रोन हल्ला, अमेरिकेने घेतले या देशाचे नाव
Follow us
| Updated on: Dec 26, 2023 | 7:05 AM

मुंबई, दि.26 डिसेंबर | २१ भारतीय लोकांना घेऊन प्रवास करणाऱ्या समुद्रातील केमिकल वाहतूक करणाऱ्या जहाजावर ड्रोन झाला होता. या हल्ल्यात जहाजाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हल्ला झालेले केमिकल टँकर असणारे जहाज मुंबईतील समुद्रकिनारी दाखल झाले आहे. त्यानंतर भारतीय नौदालाने रेसक्यू ऑपरेशन केले. जहाजाची तपासणी केली. नौदलाने केलेल्या पाहणीत जहाजावर ड्रोन हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या जहाजाच्या फॉरेन्सिक आणि इतर तपासण्याही करण्यात येणार आहेत. एम व्ही केम प्लुटो अस या बोटीच नाव आहे. या जहाजावर २१ भारतीय तसेच १ व्हिएतनाम देशाचा नागरिक होता.

अमेरिकेने घेतले इराणचे नाव

भारतीय जहाजावर हल्ला प्रकरणात अमेरिकेने इराणचे नाव घेतले आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभाग पेंटागनकडून इराणने लॉन्च केलेल्या ड्रोन हल्ल्यात भारतीय जहाजाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. परंतु इराणने अमेरिकेचा दावा फेटाळला आहे. २३ डिसेंबर रोजी अरबी समुद्रात एमवी केम प्लूटो (MV Chem Pluto) या भारतीय मालवाहू जहाजावर हल्ला झाला होता. त्यानंतर भारतीय कोस्ट गार्डच्या संरक्षणात हे जहाज मुंबईत आणले गेले. हे जहाज सौदी अरेबियातील मैगलोर येथून भारताकडे येत होते. जहाजावर लायबेरियाचा ध्वज लावण्यात आला होता.

जहाजाचे मोठे नुकसान

नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रोन हल्ल्यात जहाजाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नौदलाची टीम संपूर्ण जहाजाची तपासणी करुन अहवाल देणार आहे. अरबी समुद्रात हा हल्ला कसा झाला? याची तपासणी नौदल करत आहेत. त्यानंतर भारतीय नौदल भारतीय जहाजांच्या सुरक्षेसंदर्भात पुढील पाऊल उचलणार आहे. भारतीय तटरक्षक दल, नौदल आणि भारतीय गुप्तचर संस्था एकत्रितरित्या जहाजावर झालेल्या हल्ल्याचा तपास करणार आहे. हल्ला झालेला परिसर आणि हल्ल्यामुळे जहाजाचे झालेले नुकसान यांची पाहणी करण्यात येत आहे. हल्ल्यात कोणत्या प्रकारची स्फोटके वापरली गेली, त्याचेही विश्लेषण केले जात आहे.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....