Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील सर्वात महागडी डील, तब्बल इतक्या कोटींनी विकला गेला फ्लॅट

मुंबईत घर खरेदीचा देशातील सर्वात महागडा व्यवहार झाला आहे. मुंबईतील या घराची किंमत ऐकून अनेकांना घाम सुटेल. या फ्लॅटची खासियत काय आहे. जाणून घ्या.

भारतातील सर्वात महागडी डील, तब्बल इतक्या कोटींनी विकला गेला फ्लॅट
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 5:21 PM

मुंबई : मुंबईमध्ये घरांची किंमत ही गगनाला भिडत आहे. मुंबईत वाढत असलेल्या घरांच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांना मुंबईत घरं घेणं आता जवळपास अवाक्याबाहेर जाताना दिसत आहे. मुंबईत घर असावं असं अनेकांचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेकांची आर्थिक बाजू तितकी भक्कम नसते. त्यामुळेच ते मुंबईत घर खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करु शकत नाही. असं असलं तरी देखील मुंबईत महागडे घरे घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. आता मुंबईत आणखी एक विक्रम पाहायला मिळाला आहे. कारण भारतातील सर्वात महागडा फ्लॅट हा मुंबईत विकला गेला आहे. ( Most Expensive Flat in Mumbai )

18000 चौरस फुटाचा ट्रिपलेक्स फ्लॅट

मुंबईतील लोढा निवासी इमारतीतील ( Lodha Builders ) घरासाठी विक्रमी करार झाला आहे. लोढांच्या टॉवरमधील 18000 चौरस फुटाचा ट्रिपलेक्स फ्लॅट तब्बल 252 कोटी रुपयांना विकला गेला आहे. दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर येथे उद्योगपती निरज बजाज आणि मॅक्रोटेक डेव्हलपर्स ( लोढा ग्रुप ) यांच्यातील व्यवहार आजपर्यंतचा भारतातील सर्वात महागडा ( Most Expensive Flat ) व्यवहार ठरला आहे.

1,441 चौरस फुटांची गॅलरी

29 व्या मजल्यावर असणारा फ्लॅट सर्वाधिक मोठा असून, त्याचा कार्पेट एरिया 6061 चौरस फूट इतका आहे. रेराच्या नियमावलीनुसार एकूण कार्पेट एरिया 12,624 चौरस फूट असल्याचं स्पष्ट होत आहे. या ट्रीप्लेक्स फ्लॅटची वैशिष्ट्य म्हणजे यातल्या प्रत्येक फ्लॅटला 1,441 चौरस फुटांची गॅलरी/ वरांडा/ खुला टेरेस देण्यात आला आहे.

जून 2026 मध्ये पूर्ण होणार प्रोजेक्ट

या महागड्या डीलमध्ये बजाज यांनी साधारण 1,40,277 प्रती चौरस फूट इतक्या दरानं कोट्यवधी रुपये मोजले आहेत. जून 2026 मध्ये हा संपूर्ण प्रोजेक्ट तयार होईल, दोन विंग्समध्ये इथं एकूण 36 फ्लॅट्स बांधले जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

याआधी 240 कोटींमध्ये विक्री

याआधी मुंबईतील वरळी येथे देशातील सर्वात महागड्या पेंटहाऊसची ( Pent House ) विक्री झाली होती. या घराची किंमत तब्बल 240 कोटी रुपये होती. जे रतन टाटा यांच्या घरापेक्षा महाग असल्याचं सांगितलं जात होतं. हे घर वेलस्पन ग्रुपचे चेअरमन बी. के. गोयंका यांनी विकत घेतले होते.

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.