AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शीना बोरा हत्याकांड, 7 वेळा जामीन अर्ज नाकारल्यानंतर, इंद्राणी मुखर्जीला सुप्रीम कोर्टात मिळाला जामीन, 6 वर्षांपासून जेलमध्ये कैद

इंद्राणीच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला की, त्यांचा खटला गेल्या ६ वर्षांपासून सुरु आहे. तूर्तास या प्रकरणाचा लवकर निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. याचाही कोर्टाने जामिनासाठी एक आधार घेतला आहे. न्यायमूर्ती एल नागेशवर राव, बी आर गवई आणि ए एस बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा जामिनाचा निर्णय घेतला आहे.

शीना बोरा हत्याकांड, 7 वेळा जामीन अर्ज नाकारल्यानंतर, इंद्राणी मुखर्जीला सुप्रीम कोर्टात मिळाला जामीन, 6 वर्षांपासून जेलमध्ये कैद
Indrani Mukharjee get bailImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: May 18, 2022 | 2:02 PM
Share

नवी दिल्ली मुलगी शीना बोरा (Sheena bora) हिच्या हत्या प्रकरणात गेल्या सहा वर्षांपासून मुंबईच्या भायखळा मिहाल तरुंगात असलेल्या इंद्राणी मुखर्जी (Indrani Mukharjee)हिला अखेरीस सुप्रीम कोर्टाकडून (bail from Supreme Court)दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने अखेरीस तिचा जीमान मंजूर केला आहे. यापूर्वी मुंबई हायकोर्ट आणि सत्र न्यायालयांनी वेगवेगळ्या ७ जामिनांचे अर्ज फेटाकून लावले होते. जेलमध्ये असतानाच, इंद्राणीचा पती पीटर मुखर्जी याच्यापासूनही घटस्फोट झाला आहे. वैद्यकीय कारणंमुळे सुप्रीम कोर्टाने इंद्राणी मुखर्जी हिचा जामीन अखेर मंजूर केला आहे.पीटर मुखर्जी यांना लावण्यात आलेल्या अटी या इंद्राणी यांनाही लागू असतील, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. इंद्राणींचे आधीचे पती पीटर मुखर्जी हेही या प्रकरणातील आरोपी आहेत.शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केल्यामुळे, पाच महिन्यांपूर्वी या प्रकरणाला वेगळे वळण आले होते. तुरुंगात असलेल्या एका महिला कैद्याची काश्मीरमध्ये शीनाशी भेट झाली होती, असा खळबळजनक दावा इंद्राणीने केला होता

काय घडले कोर्टात

इंद्राणीच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला की, त्यांचा खटला गेल्या ६ वर्षांपासून सुरु आहे. तूर्तास या प्रकरणाचा लवकर निकाल लागण्याची शक्यता कमी आहे. याचाही कोर्टाने जामिनासाठी एक आधार घेतला आहे. न्यायमूर्ती एल नागेशवर राव, बी आर गवई आणि ए एस बोपण्णा यांच्या खंडपीठाने हा जामिनाचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलिसांनी २५ ऑगस्ट २०१५ रोजी मुलगी शीना बोरा हिच्या हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी हिला अटक केली होती.

कोर्टाने सांगितले की गेल्या ६.५ वर्षांपासून इंद्राणी जेलमध्ये आहे. आम्ही या प्रकरणाच्या मेरिटवनर कोणतीही टिप्पणी करत नाही. यातील ५० टक्के साक्षईदारांना जरी सोडण्यात आले असले, तरी हा खटला लवकर संपणारा नाही. त्यामुळे इंद्राणीला जामीन देण्यात येत आहे.

पीटर मुखर्जी यांना लावण्यात आलेल्या अटी या इंद्राणी यांनाही लागू असतील, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. इंद्राणींचे आधीचे पती पीटर मुखर्जी हेही या प्रकरणातील आरोपी आहेत.

मुलगी शीना जिवंत असल्याचा इंद्राणीचा दावा

शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केल्यामुळे, पाच महिन्यांपूर्वी या प्रकरणाला वेगळे वळण आले होते. तुरुंगात असलेल्या एका महिला कैद्याची काश्मीरमध्ये शीनाशी भेट झाली होती, असा खळबळजनक दावा इंद्राणीने केला होता. इंद्राणीने या प्रकरणात सीबीआय संचालकांना पत्र पाठवले होते. त्यांनी शीना बोरा हिचा तपास काश्मिरात करावा, असे अपीलही केले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआय करीत आहे. शीना हिचा गळादाबून हत्या केल्याचा आणि नंतर तिचा मृतदेह जमिनीत गाडल्याचा इंद्राणीवर आरोप आहे.

सीबीआय शीना बोरा प्रकरण बंद करण्याच्या होती प्रयत्नांत

शीना बोरा प्रकरणाचा तपास बंद करण्याचा निर्णय सीबीआयने घेतला होता. मुंबईच्या स्पेशल कोर्टात सीबीआयने सांगितले होते की, २०१२ सालच्या या प्रकरणातील त्यांचा तपास पूर्ण झाला आहे. सीबीआयने या प्रकरणात तीन आरोपपत्रं आणि दोन पुरवणी आरोपपत्रं दाखल केली होती. यात इंद्राणी मुखर्जी, तिचा ड्रायव्हर श्यामवर राय, जुना पती संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी यांना आरोपी करण्यात आले होते.

काय आहे शीना बोरा ह्त्या प्रकरण

पोलिसांनी इंद्राणी मुखर्जीचा ड्रायव्हर शामवर राय याला बंदुकीसह अटक केल्यानंतर, हे प्रकरण समोर आले होते. सीनाची हत्या २०१२ साली इंद्राणीने एका कारमध्ये गळा दाबून केल्याची माहिती या ड्रायव्हरने दिली होती. इंद्राणीच्या अटकेनंतर तीचा आधीचा पती संजीव खन्ना यालाही मुलीच्या हत्येत मदत केल्याप्रकरणी आणि पुरावे नष्ट करण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली होती. इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जी याला शीना ही आपली बहीण असल्याचे इंद्राणीने सांगितले होते. शीना बोरा आणि पीटर मुखर्जी यांचा मुलगा राहुल यांच्यात जवळीक होती. २०१२ साली शीना अचानक बेपत्ता झाल्यानंतर राहुलने तिचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. जेव्हा हे प्रकरण सोमर आले, तेव्हा बाहेर आले करी इंद्राणीनेच बांद्यात शीनाचा कारमध्ये गळा दाबून खून केला आणि रायगड जिल्ह्यात तिचा मृतदेह जमिनीत गाडला. शीना बोराचे अवशेषही केंद्रीय यंत्रणांना सापडले होते, मात्र इंद्राणीने ते मान्य केले नव्हते. या प्रकरणात इंद्राणीचा दुसरा पती पीटर मुखर्जी यालाही सीबीआयने अटक केली होती. २०२० साली त्याला जामीन मिळाला होता. या सुनावणीच्या काळाच २०१९ साली १७ वर्षे असलेल्या पीटर आणि इंद्राणी यांच्या नात्याचीही अखेर झाली होती. त्यांनी घटस्फोट घेतला

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.