Cyrus Mistry death: प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर उद्योगपती आनंद महिंद्रांनी घेतली शपथ, म्हणाले..

सायरस मिस्त्री हे मागच्या सीटवर बसले होते, त्यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता. त्यामुळे डिव्हायडरवर गाडी आदळल्यानंतर त्यांना जबर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येते आहे. आता या अपघातानंतर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनी (Anand Mahindra)ट्विट करत, एक शपथ घेतली आहे.

Cyrus Mistry death: प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर उद्योगपती आनंद महिंद्रांनी घेतली शपथ, म्हणाले..
आनंद महिंद्रांनी घेतली थपथ Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 7:43 PM

मुंबई- टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry)यांच्या मृत्यूनंतर अपघात, रस्त्यांवरील प्रवास, वाहतूक, उपाययोजना, कार चालवताना घ्यायची काळजी, असे मुद्दे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सीट बेल्टबाबत (Seat belt)पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. जर सायरस मिस्त्री यांनी सीट बेल्ट लावला असता, तर त्यांचा प्राण वाचले असते असे सांगण्यात येते आहे. अपघात होण्यापूर्वी त्यांची गाडी अतिशय वेगाने धावत होती. सायरस मिस्त्री हे मागच्या सीटवर बसले होते, त्यांनी सीट बेल्ट लावलेला नव्हता. त्यामुळे डिव्हायडरवर गाडी आदळल्यानंतर त्यांना जबर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येते आहे. आता या अपघातानंतर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांनी (Anand Mahindra)ट्विट करत, एक शपथ घेतली आहे.

नेहमी सीट बेल्ट लावीन – महिंद्रा

सायरस मिस्त्री यांच्या मृत्यमुळे आनंद महिंद्रा यांचा मोठा धक्का बसला आहे. त्यांनी ट्विट करुन सायरस मिस्त्री यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये मागे बसलेलो असे तरी यापुढे सीट बेल्ट बांधीन, अशी शपथच घेतली आहे. तसेच त्यांनी सगळ्यांनाच सीट बेल्ट नक्की लावा, असे आवाहनही केले आहे.

सीट बेल्टने कसा वाचेल जीव

प्रवासात नेहमी सीट बेल्ट हा सुरक्षेचा उपाय सांगण्यात येतो. ज्यावेळी अपघात होतो, त्यावेळी सीट बेल्टमुळे प्रवाशाचा जीव वाचू शकतो. यापूर्वीही अनेकदा सीट बेल्टमुळे अनेकांचे प्राण वाचलेले आहेत. ज्यावेळी गाडीला अपघात होतो, तेव्हा गाडी समोर जोरात आदळते. सीट बेल्ट लावलेला असेल तर प्रवाशी जोरात पुढे किंवा मागच्या बाजूला सरकतात. सीट बेल्ट अशावेळी प्रवाशांना वाचवू शकतो. तसेच जर अपघात झाला त्यावेळी सीट बेल्ट लावलेले असतील तर एयर बॅग लेगच उघडते. त्यामुळे पुढे आदळण्यापासून प्रवाशाचा जीव वाचू शकतो.

केंद्र सरकारने थ्री पाँइंट सीट बेल्ट केले आहेत बंधनकारक

फेब्रुवारी 2022 मध्ये याच संबंधात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली होती. त्यात सर्व वाहननिर्मिती कंपन्यांना थ्री पाँइंट सीट बेल्ट ठेवणे हे बंधनकारक करण्यात आले होते. या आदेशान्वये वाहनांची निर्मिती करतानाच, मागे बसलेल्या आणि मध्ये बसलेल्या प्रवाशांसाठीही सीट बेल्ट बंधनकारक करण्यात आलेत. त्यावेळी गडकरींनी सांगितले होते की, देशात प्रत्येक वर्षी सुमारे 5 लाख दुर्घटना होतात. त्यात सुमारे 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो. पहिल्यांदा 8 प्रवासी असलेल्या वाहनात 2 सेफ्टी एयर बॅग बंधनकारक होत्या. आता त्या 4 ने वाढवण्यात येत आहेत.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....