पायाभूत सुविधांची कामे नियोजित वेळेत आणि दर्जेदार व्हावीत; आदित्य ठाकरेंच्या हस्ते वरळीत विविध कामांचे भूमिपूजन
मुंबईत विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेली विकास आणि पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत.
मुंबई : मुंबईत विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेली विकास आणि पायाभूत सुविधांची कामे दर्जेदार आणि नियोजित वेळेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. (Infrastructure works should be on time and of quality; Aditya Thackeray inaugurates various works in Worli)
श्री ठाकरे यांच्या हस्ते आज वरळी परिसरातील नेहरू सायन्स सेंटर जंक्शन, फिनिक्स मुंबई मिल्स फ्लायओव्हरखालील जागा, सेनापती बापट मार्ग, पांडुरंग बुधकर मार्ग, सायानी रोड, गोखले रोड, अॅनी बेझंट रोडवरील सौंदर्यीकरण आणि फुटपाथच्या कामांचे तसेच सर पोचखानवाला रोड व खान अब्दुल गफार खान रोडला जोडणाऱ्या पायवाटेच्या (हिलटॉप लेन) सौंदर्यीकरण व नूतनीकरणाच्या कामांचे भूमिपूजन झाले.
या कामांना आजपासूनच सुरूवात होत आहे. यावेळी नगरसेवक स्नेहल अंबेकर, समाधान सरवणकर, माजी राज्यमंत्री सचिन अहिर, माजी आमदार सुनिल शिंदे, महापालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते.
मुंबईच्या विकासात सर्वांचा सहभाग असावा या ठाकरे यांच्या आवाहनानुसार आज भूमिपूजन होत असलेली कामे राज्य शासन, मुंबई महानगरपालिका यांच्या निधीसह फिनिक्स मिल्स, आदित्य बिर्ला ग्रुप यांच्या सीएसआर निधीमधून करण्यात येणार आहेत. या कामांची पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माहिती घेतली.
Today, I launched the commencement of various works to increase functionality and aesthetics in my Worli constituency. These works will set a new precedent in the Ease of Living standards. pic.twitter.com/FBSeGDvYsj
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 21, 2021
या परिसराचे सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण करताना टाकाऊ पदार्थांपासून सुंदर कलाकृती निर्माण करून त्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यांचीही पाहणी करून ठाकरे यांनी त्याचे कौतुक केले. महानगरपालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे यांनी आदित्य ठाकरे यांना येथे करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली.
I sincerely thank Minister @mieknathshinde ji and UDD for their crucial support. Also grateful to @AdityaBirlaGrp & Phoenix Mills for their backing to two of these initiatives. We are constantly working towards Worli A+
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 21, 2021
इतर बातम्या
उद्धवजींनी पत्र द्यावं, लगेच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करतो : रावसाहेब दानवे
(Infrastructure works should be on time and of quality; Aditya Thackeray inaugurates various works in Worli)