Krishnaprakash : ‘वक्त तो वक्त है’ म्हणत व्यक्त झाले आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश; बदलीवर नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण

कृष्णप्रकाश यांच्या बदलीनंतर अंकुश शिंदे यांनी पदभारही स्वीकारला. त्यानंतर कृष्णप्रकाश काहीसे नाराज असल्याचे बोलले जात होते. कृष्णप्रकाश यांना या बदलीबाबत कोणतीही माहिती नव्हती, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Krishnaprakash : 'वक्त तो वक्त है' म्हणत व्यक्त झाले आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश; बदलीवर नाराज असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण
आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाशImage Credit source: Insta
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 1:06 PM

पुणे : पिंपरी चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश (Krishnaprakash) बदलीवर नाराज असल्याचे सूत्रांकडून समजत आहे. त्यांची इन्स्टावरची पोस्ट (Insta post) सध्या चर्चेत आहे. मेरे पसीने से मेरे मेहनत की खुशबू आती है, मेरा लहू मेरे रगों में ईमान का रंग भरता है। ऐ दौर की दुश्वारियां यूँ न इतरा मेरे हालात पे, वक्त तो वक्त है, आता और जाता है। अशी शायरी त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्या बदलीचा संदर्भ येथे लावला जात आहे. बदलीवर ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. नुकतीच त्यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचीही गोविंदबागेतील निवासस्थानी जाऊन भेटही घेतली होती. ही भेट वैयक्तिक होती, असे जरी कृष्ण प्रकाश सांगत असले तरी चर्चांना मात्र उधाण आले होते. आता पुन्हा त्यांनी इन्स्टा पोस्ट करत चर्चा अधिकच वाढवली आहे.

बदलीची कल्पना नव्हती?

कृष्णप्रकाश यांच्या बदलीनंतर अंकुश शिंदे यांनी पदभारही स्वीकारला. त्यानंतर कृष्णप्रकाश काहीसे नाराज असल्याचे बोलले जात होते. कृष्णप्रकाश यांना या बदलीबाबत कोणतीही माहिती नव्हती, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण बदली झाली तेव्हा ते परदेशात होते. या सर्व मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर नंतर त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आता इन्स्टा पोस्ट करत पुन्हा एकदा नाराज असल्याचेच दिसत आहे.

अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

20 एप्रिलला वरिष्ठ पोलिसी अधिकाऱ्यांची खांदेपालट करण्यात आली. मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आयपीएस कृष्ण प्रकाश यांना विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही. आय. पी. सुरक्षा, मुंबई येथे नियुक्त करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे धडेबाज पोलीस आयुक्त, आयर्नमन अशी आयपीएस कृष्ण प्रकाश ओळखले जातात.

आणखी वाचा :

Devendra Fadnavis Rally: औरंगाबादमध्ये राज ठाकरे, तर मुंबईत देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीला घेरणार; भाजपची रविवारी बुस्टर डोस सभा

Sanjay Raut on PM Modi: बैठक कोरोनाची पण पंतप्रधानांनी इतर विषयावरच तारा छेडल्या; राऊतांची खोचक टीका

Shiv Sena MP Meeting : शिवसेनेच्या सर्व खासदारांची उद्या ‘मातोश्री’वर बैठक; राज्यातील परिस्थिती ते महापालिका निवडणुकांवर चर्चा होणार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.