राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आलीय; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा

जळगाव येथील वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास लावण्यात आल्याच्या प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. (it's time to impose president rule in maharashtra)

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आलीय; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा
सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
Follow us
| Updated on: Mar 03, 2021 | 12:41 PM

मुंबई: जळगाव येथील वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास लावण्यात आल्याच्या प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले. आमच्या आयाबहिणींची थट्टा केली जात असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एक मार्ग आहे. या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. मुनगंटीवार यांच्या या मागणीला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हरकत घेऊन त्यांचं वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. त्यावर संबंधित वाक्य तपासून कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. (it’s time to impose president rule in maharashtra)

जळगाव येथील एका वसतिगृहात काही तरुणींना विवस्त्र होऊन नृत्य करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आज विधानसभेत त्यावरून पडसाद उमटले. आमदार श्वेता महाले यांनी जळगावच्या आशादीप वसतिगृहाचा हा विषय काढला. पोलीस महिलांचे रक्षक आहेत. पण तेच महिलांवर अन्याय करत आहेत. महिलांना नग्न करून नाचवले जात आहे हे गंभीर आहे, असं महाले म्हणाल्या.

राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही

त्यावर भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी या प्रकरणावरून प्रचंड संताप व्यक्त करत थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आल्याचं सांगितल. मी संविधानाला मानणारा आहे. संविधानाचं पालन करणारा आहे. पण राज्यात आमच्या आयाबहिणींची होत असलेली थट्टा पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या आयाबहिणीला नग्न केलं जातं हे महाराष्ट्राला शोभते काय? असा सवाल करतानाच सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. तशी मलाच मागणी करावी लागेल, असं ते म्हणाले.

मुनंगटीवारांची धमकी

मुनगंटीवारांनी राष्ट्रपती राजवटीच्या मागणीचा इशारा देताच नवाब मलिक यांनी त्याला जोरदार हरकत घेतली. मुनगंटीवार हे राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी देत आहेत. हे लोकांनी निवडून दिलेलं सरकार आहे. सरकार हे संख्याबळावर चालतं. धमक्या देणं योग्य नाही, असं सांगतानाच हल्लीच्या काळात राजकीय उद्देश ठेवून काम सुरू आहे, त्यामुळे मुनंगटीवार यांचं वाक्य कामकाजातून काढून टाकावं, अशी मागणी मलिक यांनी केली. विधानसभा अध्यक्षांनी मलिक यांची मागणी मान्य करत संबंधित विधान तपासून मुनगंटीवारांचं विधान कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असं सांगितलं.

फडणवीसांकडून बचाव

मलिक यांनी मुनगंटीवारांच्या वक्तव्याला हरकत घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुनगंटीवार यांचा बचाव केला. लोकशाहीत सरकार बरखास्त करू असं बोलण्याचा सदस्यांना अधिकार आहे. ही केवळ बातमी असती तर समजू शकलो असतो. पण या घटनेची व्हिडीओ क्लिप आहे. त्यामुळे तुम्ही संवेदनशीलतेने या घटनेवर कारवाई करावी यासाठी ही तळमळ आहे, असं फडणवीस म्हणाले. (it’s time to impose president rule in maharashtra)

दोन दिवसात चौकशी

दरम्यान, जळगाव प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दोन दिवसात या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करू, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सभागृहात दिलं. (it’s time to impose president rule in maharashtra)

संबंधित बातम्या:

Maharashtra budget session 2021 LIVE | सरकार काळजीवाहूचं आहे, शेतकरी मदतीवरुन देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तात्काळ घ्या, काँग्रेस नेत्यांचा जोर

गुजरात दंगल ही गोध्रा हत्याकांडावरची रिअ‍ॅक्शन होती: चंद्रकांत पाटील

(it’s time to impose president rule in maharashtra)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.