Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फक्त महाराष्ट्रातलेच विरोधक नाही, तर मुख्यमंत्र्यांचा थेट कर्नाटक सरकारलाही मास्टरस्ट्रोक, ‘नंदनवन’मध्ये मोठी घडामोड

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सीमाभागातील 40 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवल्याची माहिती समोर आलीय.

फक्त महाराष्ट्रातलेच विरोधक नाही, तर मुख्यमंत्र्यांचा थेट कर्नाटक सरकारलाही मास्टरस्ट्रोक, 'नंदनवन'मध्ये मोठी घडामोड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 12, 2023 | 10:06 PM

सुमेध साळवे, Tv9 मराठी, मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागाच्या तणावावरुन (Maharashtra-Karnatak birder dispute) गेल्या महिन्यात चांगलंच राजकारण तापलेलं बघायला मिळालं. सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील (Jat taluka) 40 गावांनी तर आपल्याला पाणी मिळत नसल्याने थेट कर्नाटकात (Karnataka) जाण्याचा इशारा दिला. विशेष म्हणजे कर्नाटक सरकारने त्याचकाळात महाराष्ट्र सीमा भागात पाणी सोडल्याने अनेक गावांनी कर्नाटकात जाण्याची भूमिका घेतलेली बघायला मिळाली. त्यामुळे तणाव वाढला. राज्यभरात हा मुद्दा गाजला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जत तालुक्यातील सर्व 40 गावांना नियमित पाणी पुरवठा पुरवण्याचं आश्वासन दिलं. तसेच त्यासाठी पाणी योजना आणण्याचं घोषित केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी आपलं हे आश्वासन पाळल्याची माहिती समोर आलीय.

मुख्यमंत्र्यांनी सीमाभागातील 40 गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. मुख्यमंत्र्यानी या सर्व गावांमध्ये नियमित पाणी पुरवठा सुरु केलाय. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी आज मोठ्या घडामोडी घडत असल्याची माहिती मिळत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीमा भागातील 40 गावांमध्ये नियमित पाणी पुरवठा सुरु केल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी या सर्व गावातील काही नागरीक ठाण्यात आले आहेत.

हे सुद्धा वाचा

सीमा भागातील 40 गावांचे नागरीक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील ‘नंदनवन’ निवासस्थानावर दाखल झाले आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

गावकरी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार

पाणी प्रश्न सोडवल्यामुळे सीमा भागातील 40 गावांच्या नागरिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्याचं ठरवल्याची माहिती मिळत आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीमा भागातील जत तालुकामधील तब्बल 30 सरपंच आज रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करत आहेत. सीमावादावर हा एकनाथ शिंदे यांनी कर्नाटक सरकारला दिलेला मास्टट्रोक असल्याचं मानलं जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व 30 सरपंचांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम हा रात्री दहा वाजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन या निवासस्थानी होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल. दरम्यान, मुख्यमंत्री या सगळ्या घडामोडींनंतर लवकरच सीमा भागात दौरा करणार असल्याची देखील चर्चा रंगली आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद नेमका काय?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा खरंतर गेल्या अनेक वर्षांपासूनचा वाद आहे. पण गेल्या महिन्यात कर्नाटक सरकारने अचानक महाराष्ट्रातील काही गावांवर हक्क सांगितला होता. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. विशेष म्हणजे या घडामोडींतून महाराष्ट्रातून बेळगावला जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करण्याचादेखील प्रयत्न झाला होता. त्यामुळे तणाव वाढला होता.

या दरम्यान जत तालुक्यातील काही गावांनी पाणी प्रश्नाचा मुद्दा उपस्थित करत कर्नाटकात जाण्याची भूमिका घेतली होती. या दरम्यानच्या काळात सीमावाद आणखी चिखळत चालला होता.

अखेर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रकरणात हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलावलं आणि सीमावादाची लढाई जोपर्यंत न्यायालयात सुरुय तोपर्यंत कुणीही कोणताच दावा करणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे संबंधित वाद शमला.

करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप
'हे लोकं दलाल जे मुंडेंना दारू अन् मुली पुरवतात', करूणा शर्मांचा आरोप.
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा
'त्याला मुंडेंकडून 20 कोटींची ऑफर, मला प्रेमात..', करूणा शर्मांचा दावा.
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
मराठी भाषेचं आंदोलन तूर्तास थांबवा पण.., राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश.
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण
'...म्हणून अमित ठाकरे हरले', उबाठा प्रवक्त्यानं सांगितलं पराभवाचं कारण.
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर
'घबराए नही, हम मराठी सिखाएंगे', ठाकरे गटाकडून बॅनरबाजीतून मनसेला उत्तर.
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?
करूणा शर्मा या मुंडेंच्या पत्नी आहे की नाही?; कोर्टात आज काय घडणार?.