AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NCP in Keral Election 2021 : केरळमध्ये 3 पैकी 2 ठिकाणी राष्ट्रवादीचा विजय, जयंत पाटील म्हणतात…

केरळ विधानसभा निवडणुकीत 3 पैकी तब्बल 2 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवलाय. यासह केरळमध्ये राष्ट्रवादीला सुखद धक्का बसलाय.

NCP in Keral Election 2021 : केरळमध्ये 3 पैकी 2 ठिकाणी राष्ट्रवादीचा विजय, जयंत पाटील म्हणतात...
जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 3:14 AM

मुंबई : एकिकडे देशात 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुका तर काही ठिकाणी पोटनिवडणुका पार पडल्या. त्याचा रविवारी (2 मे) निकाल घोषित झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेसला स्वराज्यात धक्का सहन करावा लागला तर नवख्या राज्यात सुखद धक्का बसलाय. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पराभवाला सामोरं जावं लागल्यानं राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. दुसरीकडे केरळ विधानसभा निवडणुकीत 3 पैकी तब्बल 2 जागांवर राष्ट्रवादीने विजय मिळवलाय (Jayant Patil comment on victory in Kerala Assembly election 2021 and Pandharpur bypoll).

यासह केरळमध्ये राष्ट्रवादीला सुखद धक्का बसलाय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात आमचा धोडक्यात पराभव झालाय. केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दोन ठिकाणी विजयी खातं उघडलंय.

राष्ट्रवादी काँग्रेस केरळमध्ये दोन ठिकाणी यशस्वी

जयंत पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसने केरळ येथे तीन तर महाराष्ट्र येथे एका जागेवर निवडणूक लढवली होती. आज झालेल्या मतमोजणीत केरळमध्ये दोन ठिकाणी यशस्वी ठरलो. मात्र, महाराष्ट्रातील पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीत आम्ही अपयशी ठरलो. येथे आमचा थोडक्यात पराभव झाला.

“दोन तालुक्यात संवाद साधता न आल्याने पराभव”

महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी चांगली मदत केली. मात्र, दोन तालुक्यात संवाद साधता न आल्याने आणि दोन तालुक्‍यातील सर्वांना सोबत घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्याने आमचा त्या ठिकाणी थोडक्यात पराभव झाला. या निवडणुकीसाठी अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे यासाठी आभार मानतो.”

पंढरपूर पोटनिवडणुकीत भगीरथ भालके हरले, समाधान आवताडेंचा विजय

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत (Pandharpur mangalwedha bypoll result) भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे (Samadhan Autade win) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये भाजप उमेदवर समाधान आवताडे हे  3733 मतांनी विजयी झाले. त्यांच्या या विजयामुळे भाजपमध्ये चैतन्य निर्माण झाले असून यापुढेसुद्धा भाजप अशाच प्रकारे महाविकास आघाडीशी दोन हात करेल, असे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे यांनी बाजी मारली.

हेही वाचा :

Pandharpur Election Result 2021 Live | पंढरपूर पोटनिवडणुकीत भगीरथ भालके हरले, समाधान आवताडेंचा विजय

2021 Vidhan Sabha Election Results LIVE : नरेंद्र मोदी यांच्याकडून ममता बॅनर्जींचं अभिनंदन, बंगालला सहकार्य करण्याचं आश्वासन

5 States Result : पाच राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा? 5 राज्यांचा संपूर्ण निकाल

व्हिडीओ पाहा :

Jayant Patil comment on victory in Kerala Assembly election 2021 and Pandharpur bypoll

भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न
भारत-पाक युद्धात मध्यस्थी केलीच नाही, मी फक्त... ट्रम्प यांचा यु-टर्न.
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं
भारतीय विमानं 100 मैल आत घुसली...वॉशिंग्टन पोस्टनं पाकला तोंडावर पाडलं.
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला
पाकला मदत करतच राहणार... तुर्कीचा राष्ट्राध्यक्ष एर्दोगन पुन्हा बरळला.
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य
MIM सर्व निवडणुका लढवणार... BMC निवडणुकीबद्दल जलील यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO
दहशतवाद्याचा शेवटचा फोन, आई-बहिणीची तळमळ पण ऐकलं नाही अन्.. बघा VIDEO.
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?
ट्रम्प भरकटलेत..ब्रिटीश लेखकाची चीन तुर्कीवर टीका,अमेरिकेला काय सल्ला?.
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल
दहशतवादी आमिर नझिर वाणीने मृत्यूपूर्वी बहिणीला केला होता व्हिडीओ कॉल.
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?
मान्सून अरबी समुद्रात दाखल, 27 मेपर्यंत केरळात धडकणर महाराष्ट्रात कधी?.
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य
तर मला आणि आंबेडकरांना सुद्धा एकत्र यावं लागेल, आठवलेंचं मोठं वक्तव्य.
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य
त्रालमध्ये 3 दहशतवादी ठार, जैश टॉप कमांडरचाही सहभाग, बघा ड्रोन दृश्य.