निरा देवघर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमिनी देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : जयंत पाटील

निरा देवघर प्रकल्पातील पात्र प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळवून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने सुरू करावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (11 जून) दिले.

निरा देवघर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमिनी देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा : जयंत पाटील
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 8:21 PM

मुंबई : निरा देवघर प्रकल्पातील पात्र प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळवून देण्याबाबतची कार्यवाही तातडीने सुरू करावी, असे निर्देश राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज (11 जून) दिले. धोमबलकवडी, निरा देवघर प्रकल्प, भाटघर धरण या प्रकल्पांसंबंधीच्या विविध प्रश्नांबाबत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत आज विधानभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी याबाबत सविस्तर चर्चा करून जयंत पाटील यांनी हे निर्देश दिलेत (Jayant Patil direct to action on land distribution of Nira devghar project affected people).

कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

धोमबलकवडी, निरा देवघर प्रकल्प, भाटघर धरण या प्रकल्पांसंबंधीच्या विविध प्रश्नांवर विधानभवनात आयोजित बैठकीत जयंत पाटील म्हणाले, “प्रकल्पासाठी संपादन केलेल्या जमिनींच्या बदल्यात संबंधित प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यास आपण बांधिल असतो. तो त्यांचा हक्कही आहे. त्यामुळे निरा देवघर प्रकल्पातील ज्या पात्र प्रकल्पग्रस्तांना अद्याप जमिनी मिळाल्या नाहीत त्यांना त्या मिळतील यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच कायद्याची अंमलबजावणी करण्याबाबत ज्या अधिकाऱ्यांकडून कर्तव्यात कसूर झाली असेल त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी.”

“प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत सविस्तर कायदे करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा शासनाच्या निर्देशाची वाट न पाहता अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तातडीने कार्यवाही करून प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करावे,” असं त्यांनी सांगितलं.

प्रकल्पग्रस्ता शेतकऱ्यांकडून सरकारचे आभार

1999 पासून देवघर निरा प्रकल्पातील 300 हून अधिक प्रकल्पग्रस्तांना अद्याप आमच्या हक्काच्या जमिनी मिळाल्या नाही. मात्र त्यावर तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीस बोलावून त्यावर तोडगा काढून आम्हाला हक्काच्या जमिनी मिळवून देण्यासाठी सकारात्मक पाऊल उचललं. त्याबद्दल प्रकल्पग्रस्त शेतकरी आनंदा डेरे, महाराष्ट्र कृष्णा खोरे प्रकल्पग्रस्त विकास संस्था निरा देवघरचे सचिव प्रकाश साळेकर, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर दिघे, संघटक संजय माने व लक्ष्मण पावगी यांनी राज्यसरकारचे आभार मानले आहेत.

हेही वाचा :

लवकर आलास, 108 वर्षांच्या जरीन आजींच्या भेटीसाठी जयंत पाटील घरी, साडी चोळी देऊन सत्कार

मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार; जयंत पाटलांचं मोठं विधान

राज्याभिषेक सोहळ्याचं वर्णन ऐकताना, त्याबद्दल लिहिताना अंगावर काटा उभा राहतो: जयंत पाटील

व्हिडीओ पाहा :

Jayant Patil direct to action on land distribution of Nira devghar project affected people

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.