एकाच घरावर कितीवेळा छापे मारणार?; देशमुखांच्या घरावरील धाडसत्रावरून जयंत पाटलांचा सवाल

राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा सीबीआयने धाड मारून फायलींची तपासणी केली. तसेच देशमुख यांच्या मुलाला आणि सूनेला अटक वॉरंट बजावलं आहे. (jayant patil on CBI raids on residence of Former Home Minister Anil Deshmukh at Nagpur)

एकाच घरावर कितीवेळा छापे मारणार?; देशमुखांच्या घरावरील धाडसत्रावरून जयंत पाटलांचा सवाल
jayant patil
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 3:31 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा सीबीआयने धाड मारून फायलींची तपासणी केली. तसेच देशमुख यांच्या मुलाला आणि सूनेला अटक वॉरंट बजावलं आहे. सीबीआयच्या या कारवाईवर राष्ट्रवादीचे प्रदेशाद्यक्ष जयंत पाटील यांनी सवाल केला आहे. एकाच घरावर कितीवेळा छापे मारणार, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला. आज बंद असताना अनिल देशमुख यांच्या घरी छापे मारण्यात आले. बंदकडून लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी असे छापे मारले जातात. छापे मारुन किती वेळा मारणार, एकाच घरावर कितीवेळा छापे झाले? असा सवाल पाटील यांनी केला.

हे मुघलांचं राज्य आहे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही देशमुख यांच्या सूनेला आलेल्या अटक वॉरंटवरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्र सरकार हे मुघलांचं आहे. छत्रपतींच्या राज्यात महिलांवर कधी कुणी हात टाकला नाही. छत्रपतींनी नेहमी महिलांचा मानसन्मानच केला आहे. या मुघलांच्या राज्यात महिलांवरील अत्याचार हा इतिहास आपण पाहिला आहे. अर्थात हे मुघलांचं राज्य चाललं आहे. महिलांचा मानसन्मान यांच्या संस्कृतीत दिसत नाही. या देशातील महिला अबला आहे असं त्यांना वाटतं. याच महाराष्टातील मुली मग ती सावित्री असू दे अहिल्या देवी किंवा राणी लक्ष्मीबाई… यांचं कर्तृत्व हे सरकार विसरलं आहे. म्हणून सर्वच महिलांवर अन्याय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण महाराष्ट्राच्या लेकी या अत्याचाराच्या पुढे खंबीरपणे उभ्या राहतील आणि यशस्वी होती. कारण त्या जिजाऊच्या लेकी आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

आजही धाडसत्रं

दरम्यान, अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सीबीआयने सकाळी 8 च्या सुमारास ही छापेमारी केली. सहा-सात अधिकाऱ्यांनी देशमुखांच्या नागपुरातील घरात प्रवेश करुन झाडाझडती सुरु केली. सीबीआयच्या धाडीननंतर देशमुखांच्या घराबाहेर तणावपूर्ण शांतता दिसत आहे. घराबाहेरील गेट बंद आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात मनी लाँडरिंग (Money Laundering Case) आणि 100 कोटी वसुली प्रकरणात (100 crore vasooli gate) ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. मागील आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांना नोटीस बजावून 16 नोव्हेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं.

देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल. देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, आदी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं लिहून हे आरोप केले होते.

संबंधित बातम्या:

आम्ही काय करून दाखवू शकतो हे दाखवण्यासाठीच आजचा बंद: प्रणिती शिंदे

बंद मोडून काढण्याची भाषा करणारे मूर्ख, बंद मोडून काढणाऱ्यांनी रस्त्यावर उतरून दाखवावंच; राऊतांचा इशारा

Maharashtra Bandh : नाशिक बाजार समितीमध्ये शुकशुकाट, कोट्यवधींची उलाढाल ठप्प; उद्योग आघाडी, शेतकरी संघटनेचा मात्र विरोध

(jayant patil on CBI raids on residence of Former Home Minister Anil Deshmukh at Nagpur)

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.