भाजपला येनकेन प्रकारे सरकारविरोधी वातावरण तयार करायचंय, त्यासाठी ST संपाचा वापर: जयंत पाटील
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे.
मुंबई : महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्यावरुन भाजपवर निशाणा साधला आहे. एसटी संपात भाजपच्या नेत्यांकडून आंदोलनात जाऊन बसणं, दंगा करणं आणि अर्वाच्च भाषेत बोलणं सुरु असल्याचं वक्तव्य जयंत पाटील म्हणाले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब याचं एसटी कर्मचाऱ्यंशी बोलणं सुरु असून प्रश्न सुटावेत, असा आमचा प्रयत्न असल्याचं पाटील म्हणाले आहेत.
राजकीय पक्ष आंदोलान पुढे जात नव्हते
आजपर्यंत सरकारी, निमसरकारी कर्मचार्यांची आंदोलने त्यांच्या संघटना करायच्या तेव्हा कोणताही राजकीय पक्ष अशा संघटनांमध्ये पुढे जाऊन आंदोलन करत नव्हता, असं पाटील म्हणाले. प्रत्येक पक्षाने या मर्यादा पाळल्या होत्या, पण भाजपला येनकेन प्रकारे सरकारच्या विरोधी वातावरण तयार करायचं आहे हे त्यासाठी सुरू आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
भाजपवाले आंदोलनात पुढं
एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना जास्त उत्सुक नाही म्हटल्यावर भाजपवाले पुढे येऊन आंदोलन करायला लागलेत. एसटीचे कर्मचारी आमचेच आहेत, त्यांचे प्रश्न सोडविण्याची इच्छा सरकारची आहे, आमची सहानुभूती आहे. पण, भाजपचे नेते आंदोलनात पुढे जाऊन बसणं, दंगा करणं, अर्वाच्च भाषेत बोलणं हे सुरू आहे.
एखादं आंदोलन राजकीय सुरू झालं की त्याला राजकीय भाषेतच उत्तर द्यावं लागते. अनिल परब यांनी संघटनांशी चर्चा केलीय, त्यांनी अनेकदा एसटी कर्मचाऱ्यांना संप मागं घेण्याचं आवाहनही केलंय. प्रश्न सुटावे अशीच आमची इच्छा आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
इतर बातम्या:
एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न उच्च न्यायालयातूनच सोडवला जाईल; अनिल परब ठाम
ऋषिकेश देशमुखांना दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 20 नोव्हेंबरपर्यंत तहकूब
‘कोण नितेश राणे? त्यांच्या आरोपांना आम्ही मोजत नाही’, राणेंच्या आरोपांना अनिल परबांचं प्रत्युत्तर