JCB Seva Mandal: जीएसबी सेवा मंडळाने उतरवला विक्रमी विमा; बाप्पावर असणार 66 किलोचे सोन्याचे दागिने; 5 दिवस होणार उत्सव
यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळातर्फे न्यू इंडिया इन्शूरन्स कंपनीकडून 316.40 कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे, मात्र एवढ्या मोठ्या विम्या प्रेमियमची रक्कम जाहीर करण्यास मंडळाने नकार दिला आहे.
मुंबई: राज्यासह मुंबईत नुकताच दहीहंडी महोत्सव (Dahihandi Festival) जोरदार उत्सवात साजरा झाला आहे, मात्र एका दहीहंडी उत्सावावेळी दुर्घटना घडून एका गोविंदाचा मृत्यू झाल्याने गालबोट लागले. त्यानंतर गोविंदाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. या घटनेवर जोरदार चर्चा चालू असताना मुंबईतील जीएसबी सेवा मंडळाने मात्र यंदा तब्बल 316.40 कोटी रुपयांचा विमा उतरवून अनोखा विक्रम केला आहे. विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाला काही दिवस उरले आहेत. बाप्पाच्या स्वागताची सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. अशातच मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ अशी ख्याती असलेल्या किंग्ज सर्कल (King’s Circle) येथील जीएसबी सेवा मंडळाने (JCB Seva Mandal) यंदा तब्बल 316.40 कोटी रुपयांचा विमा उतरवत अनोखा विक्रम रचला आहे.
जीएसबी सेवा गणेश मंडळाचे यंदाचे 68 वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच दिवसांचा गणेशोत्सव धार्मिक परंपरेनुसार साजरा केला जाणार आहे.
मंडळाच्या बाप्पावर 66 किलोचे सोन्याचे दागिने
मंडळाची बाप्पाची मूर्ती 66 किलो सोन्याचे दागिने आणि 295 किलो हून अधिक चांदी व इतर मौल्यवान वस्तूनी सजवण्यात येते. यंदा जीएसबी मंडळाने विमा उतरवल्याने मुंबईत या मंडळाची जोरदार चर्चा आहे.
न्यू इंडिया इन्शूरन्सकडून विमा
यंदाच्या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मंडळातर्फे न्यू इंडिया इन्शूरन्स कंपनीकडून 316.40 कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे, मात्र एवढ्या मोठ्या विम्या प्रेमियमची रक्कम जाहीर करण्यास मंडळाने नकार दिला आहे.
सुरक्षा रक्षक यांच्यासाठीही विमा
सर्वाधिक म्हणजेच 263 कोटी रुपयांचे विमा स्वयंसेवक पुजारी स्वयंपाकी फुटवेअर स्टॉलचे कर्मचारी पार्किंग कामगार आणि कोणतीही दुर्घटना घेतल्यास सुरक्षा रक्षक यांच्यासाठी काढण्यात आला आहे मंडप आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी 20 कोटी तर मंडपाच्या आजूबाजूच्या परिसरासाठी 0.43 लाखांचा विमा उतरवला आहे.