Jitendra Awhad: भोंग्याचा विषय फक्त दंगल माजवण्यासाठी निर्माण झालाय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

भोंग्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे.

Jitendra Awhad: भोंग्याचा विषय फक्त दंगल माजवण्यासाठी निर्माण झालाय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
भोंग्याचा विषय फक्त दंगल माजवण्यासाठी निर्माण झालाय; जितेंद्र आव्हाड यांचा आरोपImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 4:56 PM

मुंबई: भोंग्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. भोंगा हा फक्त दंगल (riot) माजविण्यासाठी निर्माण झालेला आहे, असा आरोप करतानाच भोंग्याच्या मागून कोण बोलतंय, हे सर्वांना कळतंय त्यामुळे या विषयाला अधिक महत्त्व न देता नोकऱ्या किती गेल्या याचे मोजमाप आहे का? याकडे लक्ष द्या, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाचा (supreme court) निर्णय सर्वांना मान्य झालाच पाहिजे. समाज व धर्म कोणताही असो सर्वोच्च न्यायालय सुप्रीम आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश सर्वांना ऐकावेच लागतील. आता लोकांनीच समजून घ्यायला हवे. उद्या घराच्याबाहेर सामान्य लोकांची मुलं जाणार आहेत. धर्म कोणताही असो पण दगडाला दगड लागून त्यातून अग्नी निर्माण होतो. त्या अग्नीत कोणत्याही नेत्याचं मुल जळणार नाही, पण तुरुगांत मात्र सामान्य माणसाची मुलं खितपत पडतील. या देशातील तरुणांना दंगलीच्या वाटेवर नेऊन सामान्य माणसांना देशोधडीला लावायचे हा प्रकार मला तरी अमान्य असल्याचे आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी महागाईवरून केंद्र सरकारवर टीका केली. महागाई किती वाढलीये याबद्दल कुणी बोलत नाही. पेट्रोलचे दर 125 रुपयांवर गेलेत. त्याबद्दल कुणी बोलत नाही. 2014 रोजी पेट्रोलचा दर 71 रुपये होता. त्यावेळी 410 रुपयांना मिळणारा गॅस सिलेंडर आज हजाराच्यावर आहे. पेट्रोल-डिझेल-सीएनजी महाग झाल्यामुळे दळणवळण महाग होतं त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्याच्या किंमती वाढतात, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

तर संपूर्ण देश 14 तास अंधारात जाईल

आज सकाळी वर्तमानपत्र वाचत असताना निदर्शनास आले की, भारतात केवळ आठ दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा आहे. हे काय दर्शविते? आज जर आपण कोळसा व्यवस्थित जमवला नाही. तर हा देश कमीत कमी 14 तास अंधारात राहिल. श्रीलंकेची महागाई आणि आपल्या महागाईत केवळ 17 टक्क्याचा फरक आहे. या देशाच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला तर पुढच्या काळात आपली श्रीलंका होणार नाही, याची काळजी सर्व पक्षांनी, धर्मांनी, माणसांनी घेतली पाहिजे. आता हिंस्र श्वापदे जर तुमच्या अंगात येत असतील तर कुणीच काही करु शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे लोक बेफिकीरी दाखवतायत

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी देशाच्या महागाईबाबत बोलताना संतापजनक प्रतिक्रिया दिली. याचाही समाचार जितेंद्र आव्हाड यांनी घेतला. हे लोक बेफिकीरी दाखवतायत, याचे कारण जर आपण धर्माचा द्वेष पसरवला तर आपण काहीही करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. 2014 रोजी 71 रुपये प्रतिलिटर असलेले पेट्रोल आज सव्वाशे रुपयांवर आलेले असताना अर्थमंत्री बोलणार नसतील तर आपण काय बोलणार?, असा सवालही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

Dhananjay Munde on Mitkari : अमोल मिटकरींच्या ‘भार्या समर्पयामि’ वर भरभरुन दाद देणारे धनंजय मुंडे आता म्हणतात, तर ते खेदजनक !

CM Uddhav Thackeray on Corona: कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

Amol Mitkari : मम भार्या समर्पयामि, अमोल मिटकरींचा हाच तो व्हिडीओ ज्यावर ब्राह्मण महासंघ लालेलाल, बघा पाटील, मुंडे हसून हसून लोटपोट

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.