एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरं विकता येतील : जितेंद्र आव्हाड
एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरं विकता येणार आहेत. सध्या इमारत बांधल्यानंतर 5 वर्षांपर्यंत घर विकता येत नाही.
मुंबई : एसआरए प्रकल्पातील झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी घरं विकता येणार आहेत. सध्या इमारत बांधल्यानंतर 5 वर्षांपर्यंत घर विकता येत नाही. अनेक प्रकल्प पूर्ण व्हायला 5 ते 10 वर्ष लागतात. त्यामुळे झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी एसआरएतील घर विकण्याचा निर्णय लवकरच होणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं (Jitendra Awhad comment of sale of SRA house after 5 years in Mumbai).
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “एसआरएमधील विकलेल्या घरांप्रकरणी नोटीस पाठवल्या. याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती नेमली आहे. त्यात नवाब मलिक, वर्षा गायकवाड, अनिल परब, अस्लम शेख आहेत. बिल्डिंग बांधल्यानंतर 5 वर्षात घर विकता येत नाही. त्याऐवजी त्यांची झोपडी पाडल्यापासून 5 वर्षांनी विकता येणार असा नियम बनवायला पाहिजे. तसा विचार आम्ही करतोय, समिती त्याबाबत चर्चा करून लवकर निर्णय घेईल.”
झोपडपट्टी तोडल्यापासून एसआरएचे घर मिळेपर्यंत ते घर विकण्याचा कालावधी पाच वर्षांचा करावा, असा आमचा प्रयत्न आहे. मंत्र्यांची उपसमिती यावर निर्णय घेईल. तसेच आदरणीय खा. @PawarSpeaks साहेब आणि मुख्यमंत्री ना. @OfficeofUT यांना या विषयासंदर्भात अवगत केले आहे – @Awhadspeaks pic.twitter.com/XIpbNWeqzF
— NCP (@NCPspeaks) March 12, 2021
“मुंबईच्या किनारपट्टीवर अनेक ठिकाणी झोपडपट्टी आहे. बुधवार पार्क इथे 32 एकर झोपडपट्टी आहे. 16 एकरमध्ये 300 चौरस फूटाचे घर झोपडपट्टीवासीयांना दिले. इतर जागेवर म्हाडा घरे बांधेल आणि विकेल. त्यातून म्हाडाला उत्पन्न मिळेल. अशा ठिकाणी SRA आणि म्हाडा एकत्र घर बांधू, असंही त्यांनी नमूद केलं.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, “बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाला या महिन्यात सुरुवात होणार आहे. वरळीमध्ये मुख्यमंत्री ठाकरे, खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. तीन ते चार वर्षात बीडीडी चाळ उभी राहणार असल्याचंही ते म्हणाले.
हेही वाचा :
VIDEO : जितेंद्र आव्हाड यांचं ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण
व्हिडीओ पाहा :
Jitendra Awhad comment of sale of SRA house after 5 years in Mumbai