नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकला, जितेंद्र आव्हाडांची निवडणूक आयोगाकडे मागणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे.

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकला, जितेंद्र आव्हाडांची निवडणूक आयोगाकडे मागणी
Follow us
| Updated on: Mar 15, 2020 | 10:40 AM

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Minister Jitendra Awhad) यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी आगामी नवी मुंबई महापालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याची विनंती केली आहे (Minister Jitendra Awhad).

नवी मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक पुढच्या महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि भाजपचे नेते कामालादेखील लागले आहेत. प्रत्येक पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे.  मात्र, राज्यात कोरानाचं संकट आल्यामुळे ही निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याअगोदर मनसेने ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली होती.

जितेंद्र आव्हाड यांचं पत्र

“राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. देशात 101 जण कोरोना बाधित आहेत. यापैकी राज्यात 31 जण कोरोनाबाधित असल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारी म्हणून सर्व शाळा, कॉलेजला 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय राज्यातील सर्व मॉल्स, चित्रपट थिएटर्सदेखील बंद करण्यात आली आहेत.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेऊन काही शहरांमध्ये सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. नजिकच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नियत वेळी होणार आहेत.

उपरोक्त निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक एकमेकांच्या संपर्कात येतील. त्यामुळे या संसर्गजन्य रोगांचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगपालिकेची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्यात यावी, असे सुचविण्यात येत आहे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी पत्रात म्हटलं आहे.

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

  • पुणे – 15
  • मुंबई – 5
  • नागपूर – 4
  • यवतमाळ – 2
  • नवी मुंबई – 2
  • ठाणे – 1
  • कल्याण – 1
  • अहमदनगर – 1

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले?

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • एकूण – 31 कोरोनाबाधित रुग्ण

संबंधित बातम्या :

CoronaVirus: कोरोना संसर्ग झालेल्या अधिकाऱ्याची भेट, डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना चाचणी

Corona Virus Update | पुण्यात 15 जणांना कोरोनाची लागण, राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ

महाराष्ट्रातील सर्व शाळा-कॉलेज, मॉल्स बंद, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय

CORONA : वधू-वरात तीन फूट अंतर, एकही नातेवाईक नको, पुण्यात सामूहिक विवाहासाठी ‘कोरोना’ अटी

Corona | मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द, निवडणुकाही पुढे ढकलण्याची मागणी

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.