‘पोलिसांच्या डोळ्यांमधून फक्त अश्रू येणं बाकी होतं’, आव्हाडांनी पोलीस चौकीतला सांगितला ‘तो’ किस्सा

पोलिसांची झालेली हतबल अवस्था आपल्या डोळ्यांनी बघितल्याचं जितेंद्र आव्हाडांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

'पोलिसांच्या डोळ्यांमधून फक्त अश्रू येणं बाकी होतं', आव्हाडांनी पोलीस चौकीतला सांगितला 'तो' किस्सा
प्रातिनिधिक फोटोImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 5:32 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची आज जामिनावर सुटका झाली. त्यांनी सुटकेनंतर पत्रकार परिषद घेऊन आपली सविस्तर प्रतिक्रिया दिली. विवियाना मॉलमध्ये आपण प्रेक्षकांना मारहाण केली नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलं. तसेच आपला ‘हर हर महादेव’ चित्रपटाला विरोध का आहे? ते डॉक्यूमेंट्री दाखवत स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. आपल्याला दिवसभर पोलीस ठाण्यात ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले. पोलिसांचा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी पोलिसांची झालेली हतबल अवस्था आपल्या डोळ्यांनी बघितल्याचं सांगितलं.

“ठाण्याच्या वर्तक नगरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा या प्रकरणाशी शून्य संबंध आहे. त्यांची हतबलता मला प्रत्येक मिनिटाला समजत होती. त्यांच्या डोळ्यांमधून फक्त अश्रू येणं बाकी होतं. बाकी सगळे हतबल होते. कारण असं कुणाला अटक करत नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“मला जी कलम 41 अ अन्वये नोटीस देण्यात आली होती ती दुपारी दोन वाजता मिळाली होती. आणि त्यामध्ये पाच वाजता हजर व्हावे, असं सांगितलं होतं. त्याआधीच त्यांनी मला अडीच वाजता अटक केली”, असा दावा आव्हाडांनी केला.

हे सुद्धा वाचा

“सात वर्षाच्या आतमध्ये असलेल्या शिक्षेसाठी तुम्हाला नोटीस द्यावी लागते.सुप्रिया कोर्टाने याबाबत काही नियम लागू केले आहेत. मुंबई हायकोर्टाचे जस्टीस डांगरे यांनी सप्टेंबरमध्ये नोटीस दिल्यानंतर 72 तासांमध्ये अटक करु नये, असं म्हटलं आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“माझ्याबरोबर बारा आरोपी आहोत. माझ्या नोटीसवर क्रिमिनल अॅमेंडमेंट अॅक्ट सेक्शन 7 टाकण्यात आलं. इतरांवर टाकण्यात आलं नाही. म्हणजे यांना एखाद्या दिवशी जेलमध्ये ठेवायचंच असेल तर कोणतं कलम लावावं हे त्यांच्या मनात होतं. पण कलमसाठी त्यांना तक्रारदार मिळत नव्हता तर त्यांनी जोरजबरदस्ती मॉल आणि सिनेपोलिसांवर केला. माझ्या नोटीसवर क्रिमिनल अॅमेंडमेंट अॅक्ट सेक्शन 7 ची शिक्षा सहा महिन्याचीच आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“तुम्ही कुणाच्यातरी उपजिविकेमध्ये बाधा निर्माण केली तर संबंधित कलमाअंतर्गत गुन्हा दाखल होतो. पण जो चित्रपट बंद झाला होता तो पुढच्या पंधरा मिनिटांत सुरु झाला. ज्या सिनेमागृहात चित्रपट बंद पाडला त्यांच्याकडून तक्रार करण्यात आली नाही”, असं ते म्हणाले.

“या प्रकरणात तक्रारदारच नाही. म्हणजे कोणतीही कायदेशीर बाजू न पडताळता घाईगडबडीत अटक करण्यात आली. आम्ही काहीही करु शकतो हे फक्त महाराष्ट्राला दाखवण्यासाठी अटक केली”, असा घणाघात जितेंद्र आव्हाडांनी केला.

“खरं पाहिलं तर मला अटक केल्यानंतर तीन वाजता कोर्टात नेऊ शकले असते. तिथे जामिनावर सुनावणी होऊ शकली असती. पण पाच-सहा वाजेपर्यंत टाईमपास केला. मला आतमध्ये कसं ठेवता येईल, यासाठी प्रयत्न केला गेला”, असं आव्हाड म्हणाले.

“आमचा गुन्हा काय होता? आमचा गुन्हा एवढाच होता की आम्ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल होणारी बदनामीला विरोध करत होतो”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.