Jitendra Awhad : दिलीप वळसे पाटील यांचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल; जितेंद्र आव्हाड म्हणाले, हा माणूस…

राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. त्यावरून दिलीप वळसे पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

Jitendra Awhad : दिलीप वळसे पाटील यांचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल; जितेंद्र आव्हाड म्हणाले, हा माणूस...
dilip walse patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 9:29 AM

मुंबई | 21 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार हे उत्तुंग नेते आहेत असं आपण म्हणतो. त्यांच्या आसपास फिरकणारा देशात एकही नेता नसल्याचं आपण म्हणतो. पण त्यांना राज्यात कधीच एकहाती सत्ता आणता आली नाही, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. दिलीप वळसे पाटील यांचा हा हल्ला शरद पवार गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका करतानाच वळसे पाटील यांच्या निष्ठेवरच बोट ठेवलं आहे.

हा व्हिडिओ पाहिला आणि वळसे पाटील यांची झालेली नैतिक अधोगती पाहून वाईट वाटले. साहेबांचा सर्वात विश्वासू साथीदार, साहेबांच्या लेखी अत्यंत हुशार असणारा हा माणूस, प्रत्यक्षात मात्र अत्यंत कृतघ्न निघाला. साहेबांच्या नजरेने या माणसातील हा गुण कसा काय हेरला नाही याचं आश्चर्य वाटते. साहेबांनी घडवलेल्या दुसऱ्या फळीतील बहुतांशी नेत्यांनी आता आपली निष्ठा ही सत्तेसाठी पार विकून खाल्ली आहे. बाजूच्या मतदार संघात आमदार निवडून आणू शकले नाही. अन् शरद पवारांबद्दल बोलत आहेत, अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा

विष बाहेर पडले

वळसे पाटील जे काही बोलले, त्याबद्दल काही वाईट वाटत नाही…पण शरद पवारांसाठी मात्र खूप वाईट वाटले. अनेकांना सर्व काही देऊन देखील साहेब मात्र कायमच रीते राहिले..!! बरे झाले साहेबांविषयी यांच्या मनातले विष बाहेर पडते आहे. महाराष्ट्र विसरणार नाही. क्षमा करणार नाही. आंबेगाव धडा शिकवेल, असा हल्लाच आव्हाड यांनी चढवला आहे.

तुम्ही काय करत होता?

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे. तुम्ही शरद पवार यांची साथ सोडली. त्यांचा पक्ष सोडला. त्यांचे विचारही सोडले. तुम्हाला त्यांच्यावर बोलण्याचा काय अधिकार आहे? असा सवाल करतानाच राष्ट्रवादीचा स्वबळावर मुख्यमंत्री बनला नाही. त्याला तुम्हीही जबाबदार नाहीत का? तुम्ही काय करत होता? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.