Jitendra Awhad : दलालांनो, परीक्षार्थी उमेदवारांचे पैसे परत करा, तुमचे काम होऊ देणार नाही; आव्हाडांचा इशारा

उद्या 12 डिसेंबरला म्हाडाची परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी काही दलालांनी सेटिंग करून देतो म्हणून परीक्षार्थी उमेदवारांकडे पैसे उकळले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.

Jitendra Awhad : दलालांनो, परीक्षार्थी उमेदवारांचे पैसे परत करा, तुमचे काम होऊ देणार नाही; आव्हाडांचा इशारा
jitendra awhad
Follow us
| Updated on: Dec 11, 2021 | 7:07 PM

मुंबई: उद्या 12 डिसेंबरला म्हाडाची परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी काही दलालांनी सेटिंग करून देतो म्हणून परीक्षार्थी उमेदवारांकडे पैसे उकळले आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे. दलालांनो, परीक्षार्थी उमेदवारांचे पैसे परत करा. तुमच्याकडून कोणतेही काम होणार नाही. मी ते होऊ देणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी दोन ट्विट करून म्हाडा परीक्षाच्या नावाने खिसे भरणाऱ्या दलालांना सज्जड दम भरला आहे. म्हाडाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनो, तुमचा अधिकार, तुमच्या बुद्धीचा सन्मान करत पैशाने तो मारला जाईल असं मी कधीच होऊ देणार नाही. माझ्याकडे आलेल्या तक्रारीमध्ये काही जणांनी आपली जमीन विकली आहे. आपल्या घरातले दागिने विकले आहेत. काही जणांनी कर्ज काढले आहेत. माझी या दलालांना नम्र विनंती आहे की, हे पैसे परत करा. कारण तुम्ही त्यांच काम करू शकणार नाही आणि मी ते होऊ देणार नाही. पण असे ज्यांनी आपल्या आईचे मंगळसूत्र गहाण ठेवले आहे, आपली शेती गहाण ठेवली आहे असे पैसे घेऊन तुमची मूल-बाळ कधीच सुखी होऊ शकणार नाहीत, असा संताप आव्हाड यांनी व्यक्त केला आहे.

कुणालाही पैसे देऊ नका

कालही आव्हाड यांनी एक ट्विट करून म्हाडाच्या परीक्षेवरून उमेदवारांना सावध केलं होतं. 12 तारखेला होणाऱ्या परीक्षेबाबत अफवा पसरवल्या जात आहे. काही लोक पैसेही घेत आहेत असं ऐकायला आलं. असं जर कोणी रंगेहाथ पकडून दिलं तर त्याची गंभीर दखल घेतली जाईल. पोलिसांमध्ये दिलं जाईल आणि गुन्हे दाखल केले जातील. कृपया विद्यार्थ्यांना कुणालाही पैसे देऊ नका, असं आव्हाड यांनी सांगितलं होतं. म्हाडाची परीक्षा अत्यंत पारदर्शक पद्धतीने घेतली जाणार आहे. पास झालेल्यांचीही लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामुळे तुमचे दिलेले पैसे वाया जातील. मला नाशिक आणि आष्टीवरून फोन आला. आष्टीचा अधिकारी पैसे घेत असल्याचं सांगितलं जात आहे. अकोल्याहून फोन आले आहेत. या फसवणुकीला बळी पडू नका. या परीक्षेत कोणताही वशिला चालणार नाही. आमचा विभाग चालू देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

ही पदे भरली जाणार

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13 जागा, उप अभियंता (स्थापत्य) 13 जागा, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी 02 जागा, सहायक अभियंता (स्थापत्य) 30 जागा, सहायक विधी सल्लागार 2 जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119 जागा , कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ सहायक 6 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 44 जागा, सहायक 14 जागा, वरिष्ठ लिपीक 73 जागा, कनिष्ठ लिपीक- टंकलेखक 207 जागा, लघूटंकलेखक 20 जागा, भूमापक 11जागा आणि अनुरेखक 07 अशा एकूण 565 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

संबंधित बातम्या:

Nashik| नाशिकमध्ये कोरोना बळींच्या 3 हजार वारसांचे मदतीसाठी अर्ज; 50 हजार रुपये मिळणार, छाननी सुरू

पोल्ट्रीफार्म धारकांच्या चुकीच्या माहितीमुळे सोयापेंडच्या आयातीबाबत संभ्रमता : पाशा पटेल

Sharad Pawar Birthday | नागपुरातल्या 1995 च्या भाषणात शरद पवार RSS बद्दल काय म्हणाले?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.