सर्व कॅमेरामन, पत्रकारांना तत्काळ ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ घोषित करा; आता फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्रं

राज्यातील सत्ताधारी मंत्री आणि नेत्यांपाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील सर्व पत्रकार आणि कॅमेरामन यांनना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. (Journalists should be declared COVID-19 frontline workers, says devendra fadnavis)

सर्व कॅमेरामन, पत्रकारांना तत्काळ 'फ्रंटलाईन वर्कर्स' घोषित करा; आता फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्रं
devendra fadnavis
Follow us
| Updated on: May 12, 2021 | 1:31 PM

मुंबई: राज्यातील सत्ताधारी मंत्री आणि नेत्यांपाठोपाठ आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील सर्व पत्रकार आणि कॅमेरामन यांनना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रं लिहून ही मागणी केली आहे. (Journalists should be declared COVID-19 frontline workers, says devendra fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहिलं असून त्यात पत्रकारांच्या समस्यांकडे लक्ष वेधलं आहे. तसेच देशभरात अनेक राज्यांनी पत्रकार आणि कॅमेरामनना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्यात आल्याकडेही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे. इतर राज्यांच्या धर्तीवर आपणही पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केलं पाहिजे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पत्रकारांच्या सुरक्षेची काळजी घेणं हे कर्तव्य

सध्या सुमारे 12 राज्यांमध्ये प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून जाहीर करण्यात आले आहे. दुर्दैवाने, महाराष्ट्रात मात्र हा निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. राज्यातील अनेक ज्येष्ठ पत्रकार, पत्रकारांच्या विविध संघटना यासंदर्भात सातत्याने मागणी करीत आहेत. परवा तर राज्यातील पत्रकारांनी ऑनलाईन माध्यमांतून सांकेतिक आंदोलन सुद्धा केले. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत आपण अनेक पत्रकारांना मुकलो. या दुसर्‍या लाटेत सुद्धा या रोगाला बळी पडलेल्यांची संख्या मोठी आहे. अशात त्यांच्या सुरक्षेची, जिवितेची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. त्यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर केल्यास आपसुकच लसीकरणात त्यांना प्राधान्य मिळेल, असं फडणवीसांनी पत्रात नमूद केलं आहे.

सरकारचे मौन का?

या कोरोना साथीच्या काळात रूग्णालयात जाऊन, स्मशानभूमीत जाऊन, जनसामान्यांच्या व्यथा मांडण्यासाठी त्यांच्याशी थेट संवाद साधून हे पत्रकार बांधव या काळात काम करीत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागरण करण्यात सुद्धा पत्रकारांचा आणि माध्यमांचा मोठा वाटा आहे. कोरोना संक्रमित झालेल्या पत्रकारांची संख्या तर अतिशय मोठी आहे. असे असताना या अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर सरकार पातळीवर मौन का, हे अनाकलनीय आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात राज्य सरकारच्या अनेक विभागांना ज्याप्रमाणे ‘वर्क फ्रॉम होम’ करता येत नाही, अगदी तशीच अवस्था राज्यातील पत्रकारांची सुद्धा आहे. लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला घटनास्थळावर जाऊनच काम करावे लागते. त्यामुळे त्यांना या संकटाचा सामना करीतच काम करावे लागते. यासंदर्भातील निर्णय तत्काळ आणि विनाविलंब करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

गृहमंत्र्यांची मागणी

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनीही पत्रकार आणि कॅमेरामन यांना फ्रंटलाईन वर्कर्स जाहीर करण्याची मागणी केली आहे. पत्रकारांना ‘फ्रंट लाईन वर्कर’ घोषित करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. इतर राज्यात देखील पत्रकारांना असा दर्जा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांना ‘फ्रंट लाईन वर्कर’ म्हणून घोषित करावे, अशी मागणी वळसे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. (Journalists should be declared COVID-19 frontline workers, says devendra fadnavis)

संबंधित बातम्या:

बापरे! म्युकर मायकोसिसमुळे 50 टक्के लोकांचा मृत्यू; महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थानमध्ये थैमान

Maharashtra Coronavirus LIVE Update : अमरावतीमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार उघड, दोन डॉक्टर अटकेत

पवार साहेब, तुम्हाला दारुवाल्यांचे आशीर्वाद मिळतीलच, पण…; आमदार अनिल बोंडेंचं शरद पवारांना खरमरीत पत्रं

(Journalists should be declared COVID-19 frontline workers, says devendra fadnavis)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.