टॉय गन दाखवून ‘जस्ट डायल’च्या कर्मचाऱ्याचे केले अपहरण केली लूटमार, आता दोघांना अटक
पैसे देत नसल्याच्या कारणावरून मनीष लोलकनाथ दुबे यांना टॉय गन दाखवून त्यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. त्यावेळी त्याला मारहाण करून त्याच्याकडून अंगठीही काढून घेऊन ती गहाणही ठेवण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले.
मुंबई: जस्ट डायलमध्ये (Just Dial) व्यवसायासाठी मित्राला पैसे दिले होते, मात्र व्यवसाय चालला नसल्याने मित्राचे आणि पैसे दिलेल्या मित्राचे खटके उडू लागले. यातूनच एक दिवस मित्राला गोरेगावमधील (Goregaon) ओबेरॉय मॉलजवळ शिवीगाळ करण्यात आली. त्यावेळी शाब्दिक चकमक होऊन त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर जस्ट डायलमध्ये काम करणाऱ्या मित्राकडे पैशाचा तगादा लावण्याता आला. तगादा लावूनही पैसे दिले नसल्याने त्यानंतर पैसे घेण्यासाठी संशियतांनी एक नामी शक्कल लढवली. पैसे देत नसल्याच्या कारणामुळे नंतर शिवम माळी आणि अमित सिंगनी टॉय गन दाखवून पैसे उकळले आणि सोनेही काढून घेतले. हे सगळे केले तर त्त्यांनी टॉय गनचा धाक दाखवून.
पैसे देत नाही म्हणून नामी शक्कल
आपल्याकडील पैसे आणि सोन्याची अंगठी काढून घेतल्यामुळे त्यांनी या प्रकरणी मनीष लोलकनाथ दुबे यांनी पोलिात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर शिवम माळी आणि अमित सिंग यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास चालू केला आहे.
मारहाण करून अंगठी घेतली
पैसे देत नसल्याच्या कारणावरून मनीष लोलकनाथ दुबे यांना टॉय गन दाखवून त्यांचे अपहरण करून मारहाण करण्यात आली. त्यावेळी त्याला मारहाण करून त्याच्याकडून अंगठीही काढून घेऊन ती गहाणही ठेवण्यात आली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेले.
सोने गहाण ठेवून पैसे काढले
त्यानंतर तात्काळ पोलिसांनी संशियत आरोपींविरोधात कारवाई करत तपास सुरू करण्यात आला. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर सोने गहाण ठेवून पैसे घेऊन पळून जाणाऱ्या दोघांही आरोपींना कुरार पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
पैशासाठी बनावट रिव्हॉल्व्हर
जस्ट डायलमध्ये काम करणाऱ्या मनीष दुबे यांना बनावट रिव्हॉल्व्हर दाखवून पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र या प्रकरचे गुन्हे वाढले असल्याने नागरिकांतून भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी कुरार पोलीस पुढील तपास करत आहेत.