Kalsubai peak : ३ वर्षीय कॅन्सरग्रस्त चिमुकलीने केला हा पराक्रम, जिद्द पाहून सर्वजण चकीत
कॅन्सरशी झुंज देणाऱ्या तीन वर्षीय चिमुकलीने सर्वात उंच कळसूबाई शिखर सर केलं आहे. तिच्या जिद्दीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबई : मुंबईतील दख्खन ट्रेकर्सनी कळसूबाई शिखर आणि सांधन दरी रॅपलिंग आणि ट्रेकिंग मोहिम आयोजित करण्यात आली होती. यात कळसूबाई शिखर ज्याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखलं जाते. कळसुबाई पर्वताची उंची समुद्रसपाटीपासून 1646 मीटर एवढी आहे. कळबाई चढणे कुणाचेही काम नाही. पण एका तीन वर्षीय चिमुकलीने हे करून दाखवले आहे. वयाच्या अवघ्या तिसर्या वर्षी श्राव्या अनपट हिने अवघ्या तीन तासांच्या कालावधीत कळसूबाई हे शिखर सर केले. नाशिक जिल्ह्य़ातील बारी या गावातून तिने सकाळी ७.०० वाजता चढाई सुरू केली, तर ९.५० वाजता तिने कळसूबाई मातेचे दर्शन घेतले.
गेल्या दीड वर्षापासून कॅन्सरशी झुंज
ती गेल्या दीड वर्षांपासून ब्लड कॅन्सर शी झुंज देत आहे. श्राव्याचे वडील रोहित अनपट गेल्या ५ वर्षांपासून ट्रेकिंग करत आहेत. ते सध्या दख्खन ट्रेकर्स या संस्थेमध्ये आयोजक आणि ट्रेक लिडर म्हणून काम पाहतात. श्राव्याने कळसूबाई शिखर सर करण्यात यांचा देखील मोलाचा वाटा होता. श्राव्यासोबत चार वर्षाचा अर्णव पवार आणि 8 वर्षाचा स्वरुप नलवडे या चिमुकल्यांनीही ही कामगिरी केली आहे. श्राव्याचे वडील त्यांच्याप्रमाणेच श्राव्याला देखील ट्रेकला घेऊन जातात.
याआधीही श्राव्या ट्रेकिंगमध्ये नंंबर 1
तिने ह्याआधी वासोटा किल्ला देखील सर केला आहे. कळसुबाई सर केल्यानंतर लगेच दुसर्या दिवशी आशियातील दुसर्या क्रमांकाची दरी असणारी सांधन दरी येथे रॅपलिंग सारखी थरारक कामगिरी अत्यंत धाडसी रित्या पार पाडली. ह्याच दरीमध्ये तिने मोठमोठ्या दगडावरून ट्रेक देखील केला. मुंबईतील मानखुर्द येथे राहणारी श्राव्या सध्या तिच्या आजारावर उपचार घेत घरीच बालवाडीचे धडे गिरवत आहे. अत्यंत कमी वयात कळसूबाई सारखे शिखर आणि सांधन दरी सारख्या थरारक ठिकाणी रॅपलिंग मोहीम यशस्वीरीत्या फत्ते केल्याने तिच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यापुढे देखील तिने अशीच अनेक उंच शिखरे गाठावीत अशी तिच्या पालकांची इच्छा आहे. ह्यासाठी ते तिला गिर्यारोहणाचे धडे देखील देणार आहेत. सोबतच तिचे IPS अधिकारी बनवण्याचे स्वप्न आहे.