आजपासून रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीशेजारी महापालिकेचे स्टॉल्स, लोकलचा पास देण्यासाठी तयारी

मुंबईची लोकल ट्रेन 15 ऑगस्ट पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु होणार आहे. मात्र या लोकलमधून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी झालेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे.

आजपासून रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीशेजारी महापालिकेचे स्टॉल्स, लोकलचा पास देण्यासाठी तयारी
MUMBAI LOCAL
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 6:59 AM

मुंबई : कोरोना निर्बंधामुळे बंद असलेली मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मुंबईची लोकल ट्रेन 15 ऑगस्ट पासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु होणार आहे. मात्र या लोकलमधून कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 14 दिवसांचा कालावधी झालेल्या प्रवाशांनाच प्रवास करता येणार आहे. या प्रवाशांचे कोरोना लसीकरण प्रमाणपत्र तपासून त्यांना पास देण्यासाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. आजपासून (11 ऑगस्ट) कल्याण डोंबिवली महापालिकेकडून रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी स्टॉल सुरु करण्यात येणार आहेत.

महापालिका कार्यक्षेत्रातील कल्याण, डोंबिवली, कोपर, ठाकुर्ली, शहाड, आंबिवली, टिटवाळा या रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडकी शेजारीच महापालिकेकडून स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत. आजपासून सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत हे स्टॉल्स सुरू राहणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी दिली.

रेल्वे प्रवासासाठी पास कसा मिळवायचा?

“ज्यांच्याकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल अॅपच्या माध्यमातून रेल्वेचा पास डाऊनलोड करू शकतील. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, असे प्रवासी शहरातील पालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घेऊ शकतील”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती.

“सर्वात महत्वाचं म्हणजे, लोकल प्रवासाच्या या पासेसवर क्यू आर कोड असतील जेणेकरून रेल्वे प्रशासनाला त्याची सत्यता पडताळता येईल. मी आपणास विनंती करतो, की कुणीही अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पासेस प्राप्त करून घेवू नयेत. लसींचे दोन डोसेस घ्यावेत व प्रवास करावा”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्य जनतेला केलं आहे.

हेही वाचा बातम्या

‘ज्यांना अधिकार नाही ते फक्त बोलण्यासाठी मंत्री’, लोकलच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचा रावसाहेब दानवेंवर निशाणा

मुख्यमंत्र्यांनी लोकलचा सोपा प्रश्न अवघड केला, परवानगी देताना नवे अडथळे निर्माण केल्याचा भाजपचा आरोप

Mumbai Local : मुंबई लोकल प्रवास करण्यासाठी केवळ दोन डोसच नव्हे, आणखी एक अट पूर्ण करावी लागणार!

व्हिडीओ पाहा :

KDMC started municipal stalls near ticket counter of railway station

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.