जनतेला लोकलप्रवासाची परवानगी द्या नाहीतर 5 हजार प्रवास भत्ता, भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंची मागणी

राज्य सरकारने सर्वसामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाची तत्काळ परवानगी द्यावी, अन्यथा प्रवास भत्त्यापोटी दरमहा 5 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली.

जनतेला लोकलप्रवासाची परवानगी द्या नाहीतर 5 हजार प्रवास भत्ता, भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंची मागणी
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 5:09 PM

मुंबई : राज्य सरकारने मुंबई व उपनगरातील सर्वसामान्य माणसाला लोकल प्रवासाची तत्काळ परवानगी द्यावी, अन्यथा सर्वसामान्य माणसाला प्रवास भत्त्यापोटी दरमहा 5 हजार रुपये द्यावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी (12 जुलै) केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत उपाध्ये बोलत होते. यावेळी प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी आणि गणेश हाके देखील उपस्थित होते .

केशव उपाध्ये म्हणाले, “राज्य सरकारने गेली दीड वर्षे सर्वसामान्य जनतेसाठी उपनगरी रेल्वे सेवा बंद ठेवली आहे. त्यामुळे नोकरदार, तसेच रोजगारासाठी बाहेर पडाव्या लागणाऱ्या कष्टकरी जनतेची प्रचंड गैरसोय होत आहे. या वर्गाला प्रवासापोटी मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे. अन्य वाहनांनी प्रवास करण्यासाठी भरमसाठ खर्च तर होतो त्याचबरोबर वेळेचाही अपव्यय होतो. कोरोनामुळे उत्पन्न घटलेल्या वर्गाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. मुंबईतील प्रवासी खासगी वाहतूकदारांच्या दावणीला बांधण्याचा हा डाव आहे अशी शंका सामान्य माणसाला येऊ लागली आहे.”

“सर्वसामान्य जनतेची महाआघाडी सरकारला जाणीवच नसल्याचे चित्र”

“मुंबई, ठाणे परिसरातील जनतेने आजवर शिवसेनेला भरभरून साथ दिली आहे. या सर्वसामान्य जनतेची महाआघाडी सरकारला जाणीवच नसल्याचे चित्र दिसत आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच उपनगरी रेल्वे प्रवास बंद असल्याने याची भरपाई राज्य सरकारनेच देण्याची गरज आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

“लस खरेदीचे 7 हजार कोटी सामान्य माणसाला प्रवास भत्ता म्हणून द्यावेत”

लस खरेदीसाठी राज्य सरकारने सात हजार कोटी रुपये राखून ठेवले असल्याचे मुख्यमंत्र्यांनीच सांगितले होते. हे 7 हजार कोटी सामान्य माणसाला प्रवास भत्ता म्हणून द्यावेत व सामान्य माणसाच्या संतापाचा उद्रेक टाळावा, असेही उपाध्ये यांनी सांगितले.

हेही वाचा :

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या; दरेकर यांची ठाकरे, दानवेंकडे मागणी

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास योजना कुणासाठी? मुंबई लोकल कधी सुरु? आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले?

VIDEO: मुंबई लोकल कधी सुरू होणार?, महापौर किशोरी पेडणेकरांनंतर वडेट्टीवारांनी केलं ‘हे’ विधान

व्हिडीओ पाहा :

Keshav Upadhye demand permission of Mumbai local or travel allowance

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.