हा तर राऊतांचा कांगावा, तोंडाची वाफ कशाला दवडता?; भाजपचा पलटवार

शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीच्या चौकशीवरून केलेल्या टीकेवर भाजपने पलटवार केला आहे. (keshav upadhye reaction on sanjay raut's statement)

हा तर राऊतांचा कांगावा, तोंडाची वाफ कशाला दवडता?; भाजपचा पलटवार
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 3:34 PM

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडीच्या चौकशीवरून केलेल्या टीकेवर भाजपने पलटवार केला आहे. संजय राऊत शुद्ध कांगावा करत आहेत. त्यांच्याकडे काही पुरावे, यादी असेल तर त्यांनी थेट ईडीला द्यावी. पत्रकार परिषदेत तोंडाच्या वाफा कशाला दवडता, असा पलटवार भाजपने केला आहे. (keshav upadhye reaction on sanjay raut’s statement)

भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना संजय राऊत यांनी केलेल्या सर्व आरोपांचा समाचार घेतला. राऊत शुद्ध कांगावा करत आहेत. सकाळपर्यंत ईडीची नोटीस आलीच नसल्याचं सांगत होते. आता नोटीस आल्याचं सांगत आहेत. दोन तासांत त्यांचा सूर बदलला आहे, असं सांगतानाच राऊतांकडे 120 नव्हे 240 जणांची यादी असेल तर त्यांनी ती ईडीला द्यावी. ईडीला ही यादी देऊन कारवाईची मागणी करावी, तोंडाची वाफ कशाला दवडता? असा सवाल उपाध्ये यांनी केला. तुम्ही जर लाभार्थी नसाल तर ईडीला तशी माहिती द्या. ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊन टाका, असा सल्लाही त्यांनी दिला.

ईडी, सीबीआय या संस्था घटनात्मक आहेत. त्या नियमानुसार काम करत असतात. तुम्हाला ईडीबाबत काही तक्रार असेल तर कोर्टात जाण्याचीही संधी आहेच, असंही ते म्हणाले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. सरकारचं काम ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यावरून हे सरकार त्यांच्याच कर्माने पडेल. मुळात राज्यात सरकार आहे की नाही हेच कळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

धनुष्यबाण ते हवाबाण

दरम्यान, भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राऊत यांची पत्रकार परिषद म्हणजे धनुष्यबाण ते हवाबाण अशी होती, अशी खोचक टीका केली. राऊत यांनी नेहमीप्रमाणे तोडांची वाफ आणि नुसत्या हवेत पोकळ गप्पा झोडल्या. जे सांगायचे ते थेट सांगा आणि पुरावे देऊन मोकळे व्हा. कर नसेल तर डर कशाला?, अशी प्रतिक्रिया भातखळकर यांनी व्यक्त केली.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेऊन भाजपवर अनेक गंभीर आरोप केले. गेल्या एका वर्षापासून भाजपचे महत्त्वाचे नेते आणि हस्तक मला सातत्याने भेटण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकार टिकवू देऊ नका. सरकारच्या मोहात पडू नका. आमची सरकार पाडण्याची तयारी झाली आहे, असं मला सांगत असून धमकावलं जात आहे. आमच्याकडे ईडी, सीबीआय आणि आयकर विभाग आहे, आम्ही तुम्हा सर्वांना टाईट करणार आहोत, असंही मला धमकावलं जात आहे. पण मी त्यांना बधलो नाही. मीही त्यांचा बाप आहे, असं राऊत म्हणाले. (keshav upadhye reaction on sanjay raut’s statement)

प्रताप सरनाईक टोकन

भाजपच्या या हस्तकांनी मला 22 आमदारांची यादी दाखवली. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची नावं होती. ठाकरे परिवाराशी संबंधितांचीही नावे होती. या आमदारांवर ईडीचा दबाव आणून त्यांचे राजीनामे घेतले जाईल आणि सरकार पाडलं जाणार असल्याचं मला सांगण्यात आलं. प्रताप सरनाईक हे त्याचं टोकून असून आम्ही सरकार पाडल्याशिवाय राहणार नाही, आमची तयारी झाली आहे, असं या हस्तकांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी केला. पण सरकार पाडण्यात हे हस्तक अपयशी ठरले आहेत. कारण त्यांची डेडलाईन नोव्हेंबरची होती. म्हणूनच सरकारचे खंदे समर्थक आणि सरकार बनविण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाच्या नेत्यांना त्रास देण्याचं काम ईडी मार्फत केलं जात आहे, असा दावाही त्यांनी केला. (keshav upadhye reaction on sanjay raut’s statement)

संबंधित बातम्या:

ईडीचा धाक दाखवत 22 आमदारांचे राजीनामे घेऊन सरकार पाडण्याचा डाव; राऊतांचा मोठा आरोप

बायकांच्या पदराआडून लढाई का? संजय राऊत यांची 10 मोठी विधाने

Sanjay Raut LIVE | आम्ही लॉ मेकर, तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील, संजय राऊतांचा हल्लाबोल

23 लाखाचे दागिने, पालघर, अलिबागमध्ये जमिनी, PNB मध्ये 5 खाती, वर्षा राऊतांची प्रॉपर्टी किती?

(keshav upadhye reaction on sanjay raut’s statement)

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.