Kiran Mane on Ketaki Chitale : जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या केतकीसारख्या अनेक अभिनेत्री, किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्वविस्तर मत मांडलं आहे. माने यांची फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.  

Kiran Mane on Ketaki Chitale : जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या केतकीसारख्या अनेक अभिनेत्री, किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत
अभिनेते किरण मानेImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 11:57 PM

मुंबई : एकिकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा गाजत आहे. तर दुसरीकडे केतकी चितळे (Ketaki Chitale) प्रकरणही राज्यात  गाजतंय. केतकी चितळेला पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल ताब्यात घेण्यात आलंय. त्यानंतर आता त्यावर जोरदार राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. केतकी चितळेवर शिवसेना नेते संजय राऊत, महाविकास आघाडीचे मंत्री जिंतेद्र आव्हाड, खासदार नवनीत राणा, मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यासह दिग्ग्जांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर आता या प्रकरणी केतकीला अटकही (arrest) करण्यात आली आहेतिच्यावर मुंबईकळवा यासह इतर ठिकाणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. केतकीच्या वादग्रस्त पोस्टनंतर राज्यात तीव्र पडसाद उमटता आहेत. दरम्यान, आता यावर अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुक पोस्टद्वारे स्वविस्तर मत मांडलं आहे. माने यांची फेसबुक पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.  

अभिनेते किरण माने यांची पोस्ट

केतकी चितळेवर माने यांनी फेसबुक पोस्ट लिहिलंय की,

‘केतकी चितळेची पोस्ट सगळ्यांनी वाचली असेलच. आता तुम्हाला सांगू इच्छीतो. अशा विकृत लोकांनी खच्चून भरलेल्या क्षेत्रात आम्ही करीयर करतोय. तुम्हाला ही प्रवृत्ती नविन असेल, आम्ही कित्येक वर्ष भोगतोय. विशेषत: जातवर्चस्ववादी विचारसरणीच्या केतकीसारख्या अनेक अभिनेत्री उन्माद आणि उच्छादाचा कळस करतात. मी स्वत: अशा दोन अभिनेत्रींचा जवळून अनुभव घेतलाय. त्यांच्या उन्मादानं बोलण्याला आपण विरोध केला की ‘लेडीज कार्ड’ खेळून ‘गैरवर्तना’चे खोटे आरोप करतात. माझ्यासमोर एकदा एका अभिनेत्रीने एका थोर महामानवाविषयी अपशब्द वापरले होते. मी तात्काळ विरोध केला. तो राग मनात ठेवून त्या जातवर्चस्ववादी अभिनेत्रीने मनूवादी कलाकारांचा ‘गट’ जमवला..हळूहळू कुरबूरी सुरू केल्या.. आणि…

असो. बात निकलेगी तो दूSर तलक जायेगी.

अशा विकृतांच्या अनेक हिडीस घटना, बेताल-बिभत्स वागणे आमच्या अख्ख्या युनिटने पाहिलेय. पण अशा गोष्टी उघड करून कुणाच्या चारीत्र्यावर चिखलफेक करणं ही आपली संस्कृती नाही. पण त्याचवेळी केवळ आपल्या विरोधी विचारसरणीचे आहेत म्हणून, नेत्यांपासून महामानवांबद्दल अर्वाच्य, घृणास्पद बोलणे सहन नाही करू शकत.

…असह्य होऊन आपण बंड करून उठलो, तर त्याच अभिनेत्री नंतर पुरोगामी विचारांच्या नेत्यांचे, खासदारांचे कान भरून ‘उलट्या बोंबा’ कशा मारतात आणि आपले नेते त्यांची बाजू कशी घेतात, ते ही मी ‘याची देही याची डोळा ‘ पाहीलेय. मी भक्कम आहे. कुणाचा मिंधा नाही. पोटासाठी लाचार होणारा नाही. म्हणून पुरून उरलोय या विकृतांना. बाकी कलाकारांची काय घुसमट होत असेल कोण जाणे. सविस्तर लिहीणार आहे योग्य वेळी.

आधी कुजबूज स्वरूपात अशा वल्गना चालायच्या…गेल्या पाचसहा वर्षांत सेटवर मोठ्या आवाजात उघडपणे सुरू झाल्या.. आता पोस्ट करण्यापर्यन्त मजल गेली ! त्यामुळे ही प्रवृत्ती आता ठेचायची वेळ आली आहे.

असो. आज छ. संभाजी महाराज जयंती ! ‘बुधभूषण’ या ग्रंथात छ. संभाजी महाराज म्हणतात, “आपण एखाद्याच्या घरी गेलो आणि घरातला पुरूष घरात नसेल, तर त्या घराचा उंबराही ओलांडू नये.”

..याला म्हणतात संस्कार ! तरीही मनूवाद्यांनी शंभूराजांना महिलांविषयी वर्तनाचे खोटे आरोप ठेवून बदनाम केले.. पण काळाच्या ओघात वर्चस्ववाद्यांचे कारस्थान भेदून राजेंचे स्वच्छ, नितळ, निर्मळ चारीत्र्य लखलखून वर आले. स्वत: सततच्या लढायांमध्ये गुंतलेले असताना शंभूराजेंनी रायगडाचा मुलकी व्यवहार महाराणी येसूबाईंच्या हाती सोपवला होता. महिलेला पंतप्रधानपद देणारा पहिला राज्यकर्ता ! एवढेच नव्हे, तर त्यांनी येसूबाईंची मुद्रा चलनी नाण्यावर छापली होती.. साडेतीनशे वर्षांपूर्वी महिलेला हा सन्मान देणार्‍या महापराक्रमी महापुत्राला विनम्र अभिवादन !!!’

केतकीवर गुन्हा दाखल

केतकीवर मुंबईकळवा यासह इतर ठिकाणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. दोन गटांत वाद निर्माण करण्यासाठी प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन तिला शिक्षा होण्याची शक्यता आहेतसेच या प्रकरणात तिला जामीनही मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहेअसे मत कायदेतज्ज्ञ व्यक्त करतायेततसेच दोन गटांत वाद करणे या १५३ कायद्यानुसार ती दोषी सिद्ध झाल्यास केतकीला तीन वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहेफौजदारी वकील प्रकाश साळसिंगीकर यांनी ही माहिती दिली आहे.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...