मुंबई : माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी कोरोनावर मात केली आहे (Kirit Somaiya get discharged from hospital). किरीय सोमय्या यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. “कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय”, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी कोरोनावर मात केल्याची माहिती दिली आहे.
“मुलुंड येथील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दहा दिवसांच्या उपचारानंतर आम्ही कोरोनावर मात केली आहे. डॉ. राहुल पंडीत आणि त्यांच्या टीमकडून करण्यात आलेल्या उपचारानंतर मी आणि माझी पत्नी मेधा घरी आलो आहोत. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणि सर्वसामान्यांना मदत करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय”, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
10 Days treatment at Fortis Hospital Mulund (discharged now), Recovered Successfully from COVID with help of Dr Rahul Pandit & Team, Me & My Wife Medha back to Home.
Once again getting ready to Fight against COVID to help Common Men @BJP4India @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 18, 2020
किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 10 ऑगस्ट रोजी समोर आली होती. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. “मी आणि माझी पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या रुग्णालयात आमच्यावर उपचार सुरु आहेत,” असं ट्विट किरीट सोमय्या यांनी केलं होतं.
देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याआधी देशातील अनेक दिग्गज नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
केंद्रीय राज्यमत्री अर्जुन सिंह मेघवाल यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी यशस्वीपणे कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. येडियुरप्पा यांची कन्या पद्मावतीही कोरोना पॉझिटिव्ह आहेत, सुदैवाने पुत्र विजयेंद्र यांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर येडियुरप्पा यांच्या कार्यालयातील सहा कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.
कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली होती.
संबंधित बातमी : Kirit Somaiya | किरीट सोमय्या यांना कोरोनाची लागण, पत्नीलाही बाधा