VIDEO: किरीट सोमय्या वेडा माणूस, भाजपला भुताटकीनं झपाटलं; राऊतांची जोरदार टोलेबाजी

कोण आहे किरीट सोमय्या? (kirit somaiya) सोडून द्या. वेडा माणूस आहे, इकडे तिकडे फिरत असतो. मी कालच सांगितलं तो तुरुंगात जाईल, तो तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे. तो पळत आहे इकडे तिकडे, पळू द्या.

VIDEO: किरीट सोमय्या वेडा माणूस, भाजपला भुताटकीनं झपाटलं; राऊतांची जोरदार टोलेबाजी
किरीट सोमय्या वेडा माणूस, भाजपला भुताटकीनं झपाटलं; राऊतांची जोरदार टोलेबाजी
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 11:02 AM

हिरा ढाकणे, मुंबई: कोण आहे किरीट सोमय्या? (kirit somaiya) सोडून द्या. वेडा माणूस आहे, इकडे तिकडे फिरत असतो. मी कालच सांगितलं तो तुरुंगात जाईल, तो तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे. तो पळत आहे इकडे तिकडे, पळू द्या. मी त्यावर बोलणार नाही. लवकरच इथली जनता त्याची धिंड काढेल. तो पुढे लोक मागे. तो पुढे लोक मागे अशी त्याची अवस्था होईल. सोडून द्या. वेट अँड वॉच. तो कुठे जात आहे? बंगले शोधणार आणि घरे शोधणार, असा सवाल करतानाच भाजपच्या (bjp) लोकांना भुताटकीने झपाटलं आहे. त्यांनाही स्वप्नात बंगले दिसत आहेत, असा हल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी चढवला. संजय राऊत (sanjay raut) यांनी मीडियाशी संवाद साधताना आज पुन्हा एकदा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला.

किरीट सोमय्या आज कोर्लई गावात जाणार आहेत. ठाकरे कुटुंबाच्या 19 बंगल्यांबाबत तक्रार करण्यासाठी सोमय्या कोर्लईला जाणार आहेत. त्यावरूनही संजय राऊत यांनी सोमय्यांवर जोरदार हल्ला चढवला. बंगले अदृश्य झालेत का? आम्हीही विचारतोय बंगले कुठे आहेत? सोमय्याच्या स्वप्नात बंगले येतात, वेडा झालाय तो. त्याला स्वत:चे बंगले स्वप्नात दिसत आहेत. त्याची बेनामी प्रॉपर्टी कुठे असेल तर ते त्याला दिसत आहे. कागदपत्रं सरपंचांनी दिले आहेत. त्या जमिनीवर एकही बंगला नाही. बांधकाम नाही. याला स्वप्नात बंगले दिसतात. हा काही तरी भुताटकीचा प्रकार आहे. भाजपच्या लोकांना भुताटकीनं झपाटलं आहे. त्यांच्या स्वत:च्या बेनामी प्रॉपर्टी स्वप्नात दिसतात आणि दुसऱ्यांच्या म्हणून बोंबलतात, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

सोमय्यांमुळे नाईकांची आत्महत्या

यावेळी राऊत यांनी अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरूनही सोमय्यांवर गंभीर आरोप केले. राऊत यांनी नाईक यांच्या आत्महत्येला सोमय्याच जबाबदार असल्याचं सांगितलं. तसेच सोमय्यांनी नाईक यांना आत्महत्या करण्यापूर्वी धमक्या दिल्या होत्या असा दावाही त्यांनी केला. अर्णवकडे पैसे मागायचे नाही. त्याला बिल मागायचे नाही, अशी धमकी सोमय्यांनी नाईकला दिली होती. माझ्याकडे नव्याने माहिती आली आहे. दोनवेळा सोमय्याने अन्वय नाईकला बोलावून धमकी दिली होती. त्यानंतर नाईक यांनी आत्महत्या केली. या धमक्यानंतरच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा. भाजपच्या लोकांनी त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले हा मोठा गुन्हा आहे. या लोकांना मराठी माणसाला बदनाम करायचं आहे. हे सर्व नाईकचे हत्यारे आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांनो सावधान! वेळेत शेतसारा अदा करा अन्यथा सातबाऱ्यावर ‘महाराष्ट्र शासनाचे’ नाव, काय आहे नेमके प्रकरण?

देशात सर्वात उंच शिवरायांच्या पुतळ्याचं आज औरंगाबादेत अनावरण, ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होण्यास शिवप्रेमी उत्सुक!

Maharashtra News Live Update : अन्वय नाईक यांना किरीट सोमय्यांनी धमकी दिल्याची माझ्याकडे माहिती : संजय राऊत

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.