NCP on Somaiya: सोमय्यांनी त्यांना झालेल्या गंभीर दुखापतीचा अहवाल राज्यपालांना सादर करावा; राष्ट्रवादीने डिवचले

NCP on Somaiya: मुंबई शहरात काही दिवसापासून घडणाऱ्या सर्व नाट्यमय घडामोडींचे धागेदोरे कुठे पोहोचतात याची जनतेला चांगलीच जाणीव झाली आहे.

NCP on Somaiya: सोमय्यांनी त्यांना झालेल्या गंभीर दुखापतीचा अहवाल राज्यपालांना सादर करावा; राष्ट्रवादीने डिवचले
किरीट सोमय्यांचे राऊतांना प्रत्युत्तरImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 27, 2022 | 5:02 PM

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांची भेट घेऊन त्यांच्यावरील हल्ल्याची माहिती दिली. सोमय्या यांनी राज्यपालांच्या घेतलेल्या या भेटीवर राष्ट्रवादीने खोचक टीका केली आहे. सर्वप्रथम सोमय्या यांनी राज्यपालांना आपल्याला झालेल्या गंभीर दुखापतीचा अहवाल सादर करावा, असा खोचक टोला राष्ट्रवादीने लगावला आहे. किरीट सोमय्या यांना कोणतीही गंभीर जखम झालेली नाही, असा साधारण अहवाल भाभा रुग्णालयाने सादर केला आहे. परंतु सोमय्या यांनी आपल्या जखमेचे चांगले व्हिज्युअल्स तयार करण्याचा प्रयत्न केला, असा हल्लाबोल राष्ट्रवादीने केला आहे. राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी ही टीका केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी (maha vikas aghadi) सरकार अशा कटकारस्थानांनी अस्थिर होणार नाही. राज्य सरकार पूर्णपणे भक्कम आहे. असे कितीही खोटेनाटे आरोप केले तरी यातून काहीही सिद्ध होणार नाही, असा दावाही महेश तपासे यांनी केला आहे.

मुंबई शहरात काही दिवसापासून घडणाऱ्या सर्व नाट्यमय घडामोडींचे धागेदोरे कुठे पोहोचतात याची जनतेला चांगलीच जाणीव झाली आहे. राणा दाम्पत्याने मुंबई पोलिसांवर केलेले आरोप चुकीचे आहेत. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात कोणत्याही चुकीच्या घटना घडणार नाहीत. राणा कुटुंब ज्या भाजप पक्षाचे समर्थन करतात त्याच पक्षातील माण – खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी मागासवर्गीय समाजातील मयत पिराजी भिसे यांची खोटी कागदपत्रे तयार करून जमीन लाटण्याचा प्रकार महेश तपासे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिला. तसेच अशी फेरफार करणाऱ्या लोकांना तातडीने अटक व्हावी अशी गृहमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.

कोर्टाकडे तक्रार का केली नाही?

नवनीत राणा यांनी या संदर्भातील तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे करण्याऐवजी मुंबई हायकोर्टात का केली नाही? असा सवाल महेश तपासे यांनी उपस्थित केला. केवळ मुंबई पोलिसांना बदनाम करण्यासाठी अशी तक्रार केल्याचा आरोप करतानाच यातून जातीय, धार्मिक तेढ निर्माण करण्याचे षडयंत्र होते. पण त्यांचे भांडे आता फुटले आहे असेही महेश तपासे म्हणाले.

राणांवर ईडी काय कारवाई करणार?

युसूफ लकडावाला हा व्यक्ती अंडरवर्ल्डशी संबंधित आहे. तसेच त्याच्यावर ईडीकडून कारवाई सुरु असताना अशा व्यक्तीकडून एखादा लोकप्रतिनिधी 80 लाख रुपये घेतो. एवढे पैसे का घेण्यात आले, यामागे मनी लॉन्डरिंगचा भाग होता का, याची सखोल चौकशी व्हायला हवी अशी मागणी करतानाच महाराष्ट्र राज्यातील राजकीय नेत्यांना केंद्रीय यंत्रणेकडून अडकविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे आता नवनीत राणा यांच्या प्रकरणात केंद्रीय यंत्रणा काय भूमिका घेते याकडे आमचे लक्ष आहे, असेही ते म्हणाले.

सदावर्तेंच्या थापांना बळी पडणार नाही

गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांची हत्या झाल्यास राज्यसरकारला दोषी धरावे असे विधान केले. यावर बोलताना महेश तपासे यांनी सदावर्ते यांच्या कारनाम्यांचा पाढाच वाचून दाखवला. गुणरत्न सदावर्ते यांनी 90 हजार एसटी कर्मचाऱ्यांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळले, त्यातून महागड्या गाड्या घेतल्या, मयत एसटी कर्मचाऱ्यांना यातील काही पैसे देण्याऐवजी प्रॉपर्टीज घेतल्या. यावरही हा एसटी कर्मचाऱ्यांचा लढा आम्ही फुकट लढतोय असा आव त्यांनी आणला आहे. हे संयुक्तिक नाही अशी टीका महेश तपासे यांनी केली. शरद पवारसाहेबांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर लगेचच एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. यानंतर लोक सदावर्तेंच्या थापांना बळी पडणार नाही, असा दावा त्यांनी केला.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.