Kirit somaiya : सोमय्यांना सलग दुसरा मोठा झटका, मुलाचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांना कोर्टाने आज दुसरा झटका दिला आहे. काल किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. तर आज किरीट सोमय्या यांचा मुलागा नील सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आयएनएस विक्रांत केस प्रकरणात सोमय्या पिता पुत्राच्या अडचणी वाढताना दिसताहेत.

Kirit somaiya : सोमय्यांना सलग दुसरा मोठा झटका, मुलाचा अटकपूर्व जामीन अर्जही फेटाळला
नील सोमय्या, किरीट सोमय्या Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 3:45 PM

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांना कोर्टाने आज दुसरा झटका दिला आहे. काल किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. तर आज किरीट सोमय्या यांचा मुलागा नील सोमय्या (Neil Somaiya) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. आयएनएस विक्रांत प्रकरणात (ins vikrant) सोमय्या पिता पुत्राच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्या यांनी सेव्ह विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा निधी गोळा केला आणि हा सर्व पैसा लाटला. असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत करत आहेत. तर सोमय्या यांच्याकडूनही संजय राऊतांवर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहे. सोमय्या विरुद्ध राऊत हे राजकीय युद्ध सध्या कायद्याच्या, पोलीस आणि कोर्ट कचेरीच्या मार्गपर्यंत पोहोचले आहे. पुढील काळातही हा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

सोमय्यांचा पुन्हा जोरदार हल्लाबोल

तर भाजप नेते किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून नॉट रिचेबल होते. त्यांनी टिव्ही 9 शी बोलताना या प्रकरणात एक कागदही तक्रारदार आणि कुणीच दिला नाही. हे नुसते हवेतील आरोप केले आहेत त्यामुळे या संपूर्ण गोष्टी कोर्टासमोर मांडणार आहे, तसेच ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा सोमय्यांनी पुन्हा दिला आहे. तर कर नाही त्याला डर कशाला, आता सोमय्या का पळत आहेत. दुसऱ्यावर आरोप करायला पुढे असातात, मात्र आता पोलीस चौकशीची वेळ आल्यावर ते गायब कसे झाले, असा सवाल संजय राऊत आणि महाविकास आघाडीतील नेत्यांकडून विचारण्यात येतोय. त्यामुळे या प्रकरणावरून राज्यात सध्या जोरदार घमासान सुरू आहे.

दरेकरांची सरकारवर आरोप

तर या आरोपांना उत्तर देताना प्रवीण दरेकारांनी सरकारवर परत आरोप केले आहेत.  किरीट सोमय्या आणि माझ्याविरोधात षडयंत्र रचले जात आहे.  किरीट सोमय्या पळणारा नाही, पळवणारा नेता आहे. सेशन कोर्टात जामीन नाही मिळाल्यास हायकोर्टात जामीन मागता येतो. त्यांना वाटल्यास ते चौकशीला सामोरे जातील. तर संजय राऊतांचा अजेंडा असा आहे की आमचा नेते जेलमध्ये टाकल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. संजय राऊतांच्या प्राध्यान्याचा विषयच हा आहे. सोमय्या चौकशीला सामोरे जातील, ते काही आतंकवादी नाहीत, माजी खासदार आहेत. त्यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न हे करत आहेत. हा केवळ दहशत माजवण्याचा प्रयत्न होतोय. पोलिसांना मुद्दाम हे टास्क देण्यात आलं आहे. सोमय्यांनी जीवाची परवा न करता घोटाळे बाहेर काढले, म्हणून हे सर्व सुरू आहे, असा आरोप प्रवीण दरेकरांनी केला आहे.

Raj Thackeray Uttar Sabha : भोंगे ते हिंदुत्व, राज ठाकरे यांची उत्तरसभा कोणत्या 5 मुद्द्यांवर होणार?

Hanuman Chalisa | मनसेच्या हनुमान चालिसा रथयात्रेला परवानगी नाकारली, आता मनसेची शिवसेना भवनात हनुमान चालिसा करू देण्याची मागणी

Kirit Somaiya: किरीट, नील सोमय्या हाजीर हो, सोमय्यांच्या घरावर पोलिसांची नोटीस; उद्या हजर होणार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.