Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांना उद्या चौकशीला येण्यासाठी पोलिसांचा समन्स, INS Vikrant प्रकरणात राऊतांचे घोटाळ्याचे आरोप

भाजप नेते किरीट सोमय्यांना ट्रॉम्बे पोलिसांनी समन्स पाठवला आहे. त्यांना उद्या चौकशीला बोलावण्यात आलं आहे. INS विक्रांत घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांना उद्या चौकशीला येण्यासाठी पोलिसांचा समन्स, INS Vikrant प्रकरणात राऊतांचे घोटाळ्याचे आरोप
किरीट सोमय्या यांना चौकशीसाठी पोलिसांचा समन्सImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 10:42 PM

मुंबईभाजप नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) ट्रॉम्बे पोलिसांनी समन्स पाठवला आहे. त्यांना उद्या चौकशीला बोलावण्यात आलं आहे. INS विक्रांत (INS Vikrant) घोटाळा प्रकरणात चौकशीसाठी बोलावलं असल्याची माहिती समोर आली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलाने यात मोठा घोटाळा केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात वार पलटवार सुरू आहेत. संजय राऊत यांनी कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप सुरूवातील किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला. त्यानंतर संजय राऊतांनी आक्रमक होत किरीट सोमय्या यांच्यावर घोटाळा केल्याचा पलटवार केला. किरीट सोमय्या आणि त्यांचे सुपुत्र नील सोमय्या हे जेलमध्ये जाणार हे संजय राऊत गेल्या अनेक दिवसांपासून सांगत आहेत.

राऊतांचे आरोप काय?

गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी आहे. गुरूवारी या प्रकरणातबाबत बोलतना राऊत म्हणाले होते, किरीट सोमय्यांनी पैसे गोळा केल्याचे स्पष्ट दिसतंय. त्यांचा मुलगा आणि दोघे मिळून 711 डबे गोळा केले आणि हे सर्व पैसे त्यांनी लाटले. त्याबरोबर राज्यभवन ही भाजपची शाखा आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांचे शाखाप्रमुख आहेत. तसेच राज्यपालांनी मला पत्र दिलं हे पैसे आम्हाला मिळाले नाहीत म्हणून, मग हे पैसे गेले कुठे? हे पैसे सोमय्या यांनी लाटले आहेत, असा थेट आरोप राऊतांनी केला आहे.

काय कारवाई होऊ शकते

58 कोटींवरुन राऊत आणि सोमय्यांमध्ये संघर्ष सुरु झालाय. INS विक्रांतला वाचवण्याच्या नावाखाली, सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. आणि माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीनंतर सोमय्यांविरोधात मुंबईतल्या ट्रॉम्बे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला. किरीट सोमय्यांसह त्यांचे पुल निल किरीट सोमय्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कलम 420, कलम 406 आणि कलम 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय अशीही माहिती समोर आली आहे. कलम 420 अंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास 7 वर्षांपर्यंत जेल होण्याची शक्यताही आहे. तसेच कलम 406 नुसार गुन्हा सिद्ध झाल्यास 3 वर्षांची शिक्षा आणि कलम 34 अंतर्गत पोलीस अटक वॉरंट शिवाय अटक करु शकते, अशा तरतुदी आहेत. त्यामुळे उद्या परत हे प्रकरण आता चांगलेच तापण्याची शक्यता आहे.

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांकडून अटक, सरकारी कामात अडथळा, कटात सामील असल्याचा आरोप

ST Workers Agitation : गुणरत्न सदावर्तेंच्या अटकेची शक्यता, सदावर्तेंच्या घरी नेमकं काय घडलं? जयश्री पाटलांनी सांगितलं

St Worker Protest : एवढं धाडस येतं कुठून? आंदोलनामागचा मास्टरमाईंड शोधू, अजित पवारांचा इशारा कुणाला?

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला
31 एप्रिलला कामराकडून पलावा पुलाचे उद्घाटन',मनसे नेत्याचा सरकारला टोला.
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया
हत्येच्या कटाचे धसांचे गंभीर आरोप; मुंडेंची प्रतिक्रिया.
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला
दम नाही, त्यांनी हिंदी सिनेमे पाहणं कमी करावं, दमानियांचा धसांना सल्ला.