चोर, लफंगा, खंडणीखोर, राऊतांनी सकाळी सकाळी रॉकेट सोडलं, अन्वय नाईकला आत्महत्या करायला लावल्याचाही आरोप

दोन दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्याविरोधात बॉम्ब टाकल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज सकाळी सकाळीच सोमय्यांच्या विरोधात रॉकेट सोडलं. राऊत यांनी सोमय्यांचं नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले. सोमय्या कोर्लई (korlai village) गावात बंगले शोधायला गेले आहेत.

चोर, लफंगा, खंडणीखोर, राऊतांनी सकाळी सकाळी रॉकेट सोडलं, अन्वय नाईकला आत्महत्या करायला लावल्याचाही आरोप
संजय राऊत
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 10:32 AM

हिरा ढाकणे, मुंबई: दोन दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्याविरोधात बॉम्ब टाकल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज सकाळी सकाळीच सोमय्यांच्या विरोधात रॉकेट सोडलं. राऊत यांनी सोमय्यांचं नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले. सोमय्या कोर्लई (korlai village) गावात बंगले शोधायला गेले आहेत. जाऊ द्या. त्यांच्या पाठीपाठी जायला ते काय नेल्सन मंडेला आहेत का? ते काय क्रांतीकारक आहेत का? तो चोर आणि लफंगा आहे. या देशातील सर्वात मोठा चोर लफंगा आणि डाकू कोणी असेल तर तो हाच आहे. त्याच्या विरोधात खंडणीचे गुन्हेही दाखल होणार आहेत. त्याचा खेळ संपणार आहे. तुम्ही पाहत राहा. लवकरच हे बाप-बेटे तुरुंगात जाणार आहेत, असं सांगतानाच अन्वय नाईक यांच्या आत्महत्येसही तेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना आज पुन्हा सोमय्यांवर घणाघाती हल्ला चढवला.

या किरीट सोमय्यानेही अन्वय नाईकला काही वेळा धमक्या दिल्या होत्या अशी मला माहिती आहे. अर्णवकडे पैसे मागायचे नाही. त्याला बिल मागायचे नाही, अशी धमकी सोमय्यांनी नाईकला दिली होती. माझ्याकडे नव्याने माहिती आली आहे. दोनवेळा सोमय्याने अन्वय नाईकला बोलावून धमकी दिली होती. त्यानंतर त्याने आत्महत्या केली. या धमक्यानंतरच त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असावा. भाजपच्या लोकांनी त्यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केले हा मोठा गुन्हा आहे. या लोकांना मराठी माणसाला बदनाम करायचं आहे. हे सर्व नाईकचे हत्यारे आहेत. आणि आज त्याचा हत्यारा त्याच जमिनीवर जात आहे, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

भाजपमुळेच नाईकची आत्महत्या

त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक आहेत. त्यांना आत्महत्या का करावी लागली यावर हे लोक बोलत नाहीत. अन्वय नाईकला आत्महत्या का करावी लागली यावर भाजपच्या लोकांनी बोललं पाहिजे. ज्याच्यामुळे नाईकला आत्महत्या करावी लागली त्या गुन्हेगाराच्या समर्थनार्थ हे सर्व लोक कोर्टबाजी, पत्रकबाजी करत होते. एका मराठी उद्योजक नाईकने भाजपच्या दबावामुळे आत्महत्या केली आहे. कारण अर्णव गोस्वामीला हे लोक वाचवत होते, असा आरोपही त्यांनी केला.

सोमय्या वेडा माणूस

कोण आहे किरीट सोमय्या सोडून द्या. वेडा माणूस आहे, इकडे तिकडे फिरत असतो. मी कालच सांगितलं तो तुरुंगात जाईल, तो तुरुंगात जाण्याचा मार्ग शोधत आहे. तो पळत आहे इकडे तिकडे, पळू द्या. मी त्यावर बोलणार नाही. लवकरच इथली जनता त्याची धिंड काढेल. तो पुढे लोक मागे. तो पुढे लोक मागे अशी त्याची अवस्था होईल. सोडून द्या. वेट अँड वॉच. तो कुठे जात आहे, बंगले शोधणार आणि घरे शोधणार. तुम्ही त्याच्या मागे जाता. ही काय बातमी आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

भाजप नेत्यांना भुताटकीने झपाटलं

आम्ही म्हटलं कुठे आहेत बंगले, अदृश्य झालेत का? त्याच्या स्वप्नात बंगले येतात, वेडा झालाय तो. त्याला स्वत:चे बंगले स्वप्नात दिसत आहेत. त्याची बेनामी प्रॉपर्टी कुठे असेल तर ते त्याला दिसत आहे. कागदपत्रं सरपंचांनी दिले आहेत. त्या जमिनीवर एकही बंगला नाही. बांधकाम नाही. याला स्वप्नात बंगले दिसतात. हा काही तरी भुताटकीचा प्रकार आहे. भाजपच्या लोकांना भुताटकीनं झपाटलं आहे. त्यांच्या स्वत:च्या बेनामी प्रॉपर्टी स्वप्नात दिसतात आणि दुसऱ्यांच्या म्हणून बोंबलतात, असा हल्लाबोल त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

Aurangabad | मंत्री अब्दुल सत्तारांनी शपथपत्रात खोटी माहिती दिली? सिल्लोडमधून कुणी केले आरोप?

Nagpur NMC | नागपूर मनपा निवडणुकीची धूळवड; भाजपचे किती नगरसेवक निवडून आणण्याचे टार्गेट?

Video: अन्वय नाईक खोटं बोलत होते? बोलता बोलता किरीट सोमय्यांनी स्वत:च्या थोबाडीत मारुन घेतलं, काय आहे कनेक्शन?

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.