मढ स्टुडिओची चौकशी करा; किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मविआ सरकार असताना मढ येथील स्टुडिओमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संगनमताने मढ स्टुडिओमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. या संदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांसह संबंधित मंत्र्यांची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे किरीट सोमय्यांनी केली आहे.
मढ स्टुडिओची चौकशी करा; किरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मविआ सरकारमध्य़े असलेले पालकमंत्री अस्लम शेख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या भूमिकेची चौकशी करा
पर्यावरण मंत्री पालकमंत्री अस्लम शेख यांच्या चौकशीची मागणी
मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करुन अधिकाऱ्यांना निलंबित करा