Kishori Pednekar: राज ठाकरेंना एवढंच सांगेन, जागते रहो, नाही तर निवडणुका आल्यावर…; किशोरी पेडणेकरांचा टोला
Kishori Pednekar: आमच्या हिंदुत्वाबाबत प्रश्न विचारले जात होते. त्याला प्रश्नांना महाआरती हे उत्तर आहे. जागते रहो, एवढंच राज ठाकरेंना सांगेन. त्यांना जाग आली असेल तर चांगलंच आहे. पण आता जागच राहावं. जागते रहो.
मुंबई: आमच्या हिंदुत्वाबाबत (hindutva) प्रश्न विचारले जात होते. त्याला प्रश्नांना महाआरती हे उत्तर आहे. जागते रहो, एवढंच राज ठाकरेंना (raj thackeray) सांगेन. त्यांना जाग आली असेल तर चांगलंच आहे. पण आता जागच राहावं. जागते रहो. नाहीतर निवडणुका आल्यावर दोन महिने उठायचं अन् नंतर काहीच नाही, असा टोला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर (kishori pednekar) यांनी लगावला. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या. भोंग्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी जोरदार टीका केली. ज्या भोंग्यांना परवानग्या आहेत आणि जे प्रदूषण टाळत असतील त्यांना कोर्टानंही परवानगी दिलीय. मात्र, विनापरवाना भोंगे असतील तर परवानगी नाही. ही बाब सर्वच धर्मांना लागू राहील. देशाची फाळणी पुन्हा कुणाला हवीय का? कोणत्याही गटाची मारामारी असो, सामाजिक सलोखा बिघडत असेल तर पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी, असं आवाहनही किशोरी पेडणेकर यांनी केलं.
शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही टीका केली. कोव्हिड काळात भ्रष्टाचार झाला असं जर किरीट सोमय्यांना वाटत असेल तर तो त्यांनी बाहेर काढावा. पण खरं बोलून काढावा. कोव्हिड काळात मुंबई महापालिकेनं काय काम केलं हे लोकांना माहीत आहे. कसं काम केलंय हेही लोकांना महाीत आहे. कोणी तरी अजेंडा चालवायचा म्हणून भ्रष्टाचाराचे आरोप करु नयेत. खरं बोलून गैरव्यवहार झाला असेल तर बाहेर काढावा. एक बोट आपण दाखवतो, तेव्हा चार बोटे आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा, असा इशार किशोरी पेडणेकर यांनी दिला.
राऊतांची टोलेबाजी
दरम्यान, किरीट सोमय्या यांची आज मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे विक्रांत निधी घोटाळ्याप्रकरणी चौकशी होणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना समन्स बजावलं आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली होती. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळेच सोमय्या चौकशीला जात आहेत. या चौकशीमुळे पैसे कसे गोळा केले? त्याचं काय झाले? राजभवनात जाणाऱ्या पैशाला कसे पाय फुटले? ते कुठे गेले? याची माहिती समोर येईल. अर्थात हा तपासाचा भाग आहे. त्यावर मी बोलणार नाही, असं राऊत म्हणाले.
संबंधित बातम्या:
Sanjay Raut: कोण कुणाच्या स्पॉन्सरशीपने राजकारण करत असेल तर करू द्या; राऊतांचा राज ठाकरेंना टोला