ज्या रझा अकादमीवर बंदीची मागणी केली जातेय, त्यांच्या दंगलीमुळे महाराष्ट्राच्या डॅशिंग IPS अधिकाऱ्याचं करिअर उतारणीला लागलं माहिती आहे? वाचा सविस्तर

भाजप नेते नितेश राणे यांनी मुंबईच्या रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केलीय. तसं केलं नाही तर तिला संपवण्याची धमकीही राणेंनी दिलीय.

ज्या रझा अकादमीवर बंदीची मागणी केली जातेय, त्यांच्या दंगलीमुळे महाराष्ट्राच्या डॅशिंग IPS अधिकाऱ्याचं करिअर उतारणीला लागलं माहिती आहे? वाचा सविस्तर
arup patnaik
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 12:15 PM

मुंबई: भाजप नेते नितेश राणे यांनी मुंबईच्या रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी केलीय. तसं केलं नाही तर तिला संपवण्याची धमकीही राणेंनी दिलीय. महाराष्ट्राच्या मोठ्या अशा 4 शहरात काल दंगल उसळली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रझा अकादमी चर्चेत आलीय. ही तिच रझा अकादमी आहे जिच्यावर पुन्हा पुन्हा हिंसा भडकवल्याचा आरोप केला जातो.

पण तुम्हाला कदाचित हे माहित नसेल की रझा अकादमीच्या कथित हिंसेमुळेच महाराष्ट्रातल्या एका डॅशिंग आयपीएस (IPS)अधिकाऱ्यांचं करिअर उतरणीला लागलं. खरं तर ते जवळपास संपलंच असं म्हणायला हरकत नाही. कारण त्यानंतर हा डॅशिंग अधिकारी साईड पोस्टिंगला टाकला गेला. नंतर तर रिटायरच झाला. त्यानंतर त्यांनी ओडिशात राजकारणात प्रवेश केला. ह्या अधिकाऱ्याचं नाव आहे अरुण पटनायक.(Arup Patnaik)

नेमकं काय घडलं होतं?

अरुण पटनायक त्यावेळेस मुंबईचे पोलीस आयुक्त होते. तारीख होती 11 ऑगस्ट 2012. म्यानमार आणि आसाममध्ये मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप केला गेला. त्याचा निषेध करण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर रझा अकादमीनं निषेध मोर्चाचं आयोजन केलं. यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरुण सहभागी झाले होते. पोलीस रिपोर्टनुसार जवळपास 15 हजाराची गर्दी आझाद मैदानावर होती. सभास्थळी काही भडकाऊ भाषणं झाली. काही आक्षेपार्ह एसएमएस, फोटोज दाखवले गेल्याचं सांगितलं गेलं. त्यातून जमाव भडकला आणि त्यांनी नासधूस करायला सुरुवात केली. गाड्यांची जाळपोळ केली. जमावानं दिसेल ती गाडी फुकली. यात माध्यमांच्या ओबी व्हॅनही सुटल्या नाहीत. पोलीस गाड्याही पेटवल्या गेल्या. बसेस फोडल्या. पोलीसांवर दगडफेक केली गेली. काही महिला पोलीसांवर हात टाकल्याचेही आरोप झाले. एवढच नाही तर अमर जवान ज्योतीचीही नासधूस केली गेली. पोलीसांच्या रिपोर्टनुसार 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रॉपर्टीचं डॅमेज झालं. दुपारी 3 वाजता सुरु झालेली दंगल सायंकाळपर्यंत चालली. दोन जणांचा मृत्यू झाला. 63 जण जखमी झाले. एक नाही दोन नाही तर 58 पोलीस ज्यात अधिकाऱ्यांचा समावेश होता त्यांनाही गंभीर इजा पोहोचली.

आयपीएस अरुप पटनायक टार्गेटवर?

आझाद मैदानावर दंगल उसळली त्यावेळेस मुंबईचे पोलीस आयुक्त होते अरुप पटनायक. पटनायकांची ओळखच डॅशिंग आयपीएस म्हणून महाराष्ट्राला आहे. ते लातूरचे पहिले SP होते. त्यांनी ज्याप्रमाणं तिथल्या राजकीय नेत्यांना झटका दाखवला त्याच्या स्टोरीज अजूनही एवढ्या वर्षानंतर ऐकायला मिळतात. त्यांच्या कामाचा धडाका तसाच कायम राहिला. पण आझाद मैदानावरच्या दंगलीमुळे महाराष्ट्रातलं राजकारण पेटलं. राज ठाकरेंनी त्यावेळेस तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळेस विरोधी पक्षात असलेल्या शिवसेनेनं काँग्रेस राष्ट्रवादीला धारेवर धरलं. सामनानं त्यावेळेस जे संपादकीय लिहिलं होतं. त्यात तत्कालीन आघाडी सरकारवर कठोर शब्दात ताशेरे ओढले. आझाद मैदान दंगलीची तुलना सामनानं संपादकीयमध्ये थेट अतिरेक्यांनी केलेल्या 26-11 च्या मुंबई हल्ल्याशी केली. यावरुनच राजकीय वातावरण काय होतं याचा अंदाज येईल. शेवटी व्हायचं तेच झालं. बळी गेला तो सुपरकॉप अरुप पटनायक यांचा. त्यांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन तडकाफडकी हटवलं गेलं.

विशेष म्हणजे अवघ्या 30 मिनिटाच्या आत पटनायकांनी दंगल नियंत्रणात आणली. पोलीसांना जमावावर गोळीबार करु दिला नाही. मुंबई पेटण्यापासून वाचवल्याचं त्यांचंकौतूकही झालं. अनेक माजी आयपीएस अधिकारी ज्यात ज्युलिओ रिबेरोही होते, त्यांनी पटनायकांच्या कामाची स्तुती केली. पण पटनायकांची उतरती कारकिर्द ते थांबवू शकले नाहीत.

पटनायकांचं नंतर काय झालं?

2015 साली अरुप पटनायक हे रिटायर झाले. त्यानंतर त्यांनी बीजू जनता दलात प्रवेश केला. 2019 साली त्यांनी भुवनेश्वरमधून लोकसभेची निवडणूक लढवली पण भाजपच्या उमेदवाराकडून त्यांचा 19 हजार मतांनी पराभव झाला. त्याआधी ते ओडिशा यूथ वेलफेअर बोर्डाचे चेअरमन राहिले. त्यांना राज्य मंत्र्याचा दर्जा होता. महाराष्ट्रात ते होते त्यावेळेस पोलीस सेवेत असतानाही त्यांना राष्ट्रपती मेडलने सन्मानीत करण्यात आलं.

संबंधित बातम्या:

VIDEO: तोंडाला रुमाल, हातात काठ्या, शेकडो तरुण रस्त्यावर; अमरावतीत जमावाकडून प्रचंड दगडफेक

रझा अकादमी हे भाजपचं पिल्लू, त्रिपुराचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याचे काय कारण? संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा

Amravati Riots : महाराष्ट्रातील वातावरण बिघडवण्याचं काहींचं कारस्थान, बळी पडू नका, शांतता पाळा; नवाब मलिक यांचं आवाहन

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.