कोकणात पावसाचा धुमाकूळ, दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम

कोकण रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेच्या मार्गावर दिवाणखवटी आणि खेड दरम्यान मार्गावर दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी कोकण रेल्वेची वाहतूक रोखण्यात आली आहे.

कोकणात पावसाचा धुमाकूळ, दरड कोसळल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jul 14, 2024 | 7:30 PM

राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. कोकणात तर पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रचंड पाऊस पडतोय. विशेषत: रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसताना दिसतोय. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यात अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याची माहिती समोर येत आहे. चिपळूणच्या खेर्डी भागात मुसळधार पाऊस पडला आहे. इथे बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं आहे. मुसळधार पावसामुळे चिपळूणचा सवतसडा धबधबा प्रवाहीत झाला आहे. मुसळधार पावसामुळे सवतसड्याचं रौद्र रुप बघायला मिळत आहे. हा धबधबा प्रचंड वेगाने वाहतोय. हा सवतसडा धबधबा मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्या ठिकाणी एका ठिकाणची रेल्वे वाहतूक ठप्प झाल्याची माहिती मिळत आहे.

कोकण रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वेच्या मार्गावर दिवाणखवटी आणि खेड दरम्यान मार्गावर दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी कोकण रेल्वेची वाहतूक रोखण्यात आली आहे. बाकी मार्गावरील वाहतूक सुरू आहे. मार्गावरील दरड दूर करण्यास किमान दोन ते अडीच तासांचा वेळ अपेक्षित आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्याला काल रात्रीपासून पावसाने झोडपलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडतोय. रत्नागिरी जिल्ह्यात पुढचे आणखी दोन दिवस पावसाचा जोर असाच राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

कर्जत ते खोपोली लोकल सेवा उशिराने सुरु

मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईतही सध्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडतोय. या पावसाचा फटका आता लोकल वाहतुकीवरही पडताना दिसतोय. मुसळधार पावसामुळे कर्जत ते खोपोली लोकल सेवा उशिराने सुरु आहे. साचलेल्या पाण्यातून लोकलचा हळूहळू प्रवास खोपोलीकडे प्रवास सुरु आहे. खोपोली दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचलं आहे. रेल्वे रूळावर नदीच स्वरूप प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पुण्याहून NDRF च्या तीन तुकड्या कोकणात दाखल

पुण्याहून NDRF च्या तीन तुकड्या रायगड, रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये दाखल झाले आहेत. NDRFची एक तुकडी चिपळूण तर रायगड आणि खेडमध्ये एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. गरज पडल्यास पुण्याहून अजून तुकड्या मागणव्यात येतील, अशी माहिती पुणे NDRF प्रमुखांनी माहिती दिलीय. NDRF टीमकडून रायगड, रत्नागिरी आणि चिपळूणमध्ये बचावकार्य सुरू आहे.

Non Stop LIVE Update
भाजपनं कंगनाला झापलं; ‘त्या’ वक्तव्यानंतर पक्षाचं अधिकृत पत्र जाहीर
भाजपनं कंगनाला झापलं; ‘त्या’ वक्तव्यानंतर पक्षाचं अधिकृत पत्र जाहीर.
'तुम्हाला इथे काय XX..', उद्घाटनाला गेले पण दादांनी झापलं अधिकाऱ्यांना
'तुम्हाला इथे काय XX..', उद्घाटनाला गेले पण दादांनी झापलं अधिकाऱ्यांना.
बदलापूरच्या आरोपीला 'वेडा' दाखवून वाचवण्याचा प्रयत्न..-वकील असीम सरोदे
बदलापूरच्या आरोपीला 'वेडा' दाखवून वाचवण्याचा प्रयत्न..-वकील असीम सरोदे.
“शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार अन्...”, कंगना रणौतचं वक्तव्य
“शेतकरी आंदोलनादरम्यान महिलांवर बलात्कार अन्...”, कंगना रणौतचं वक्तव्य.
पंढरपुरात पुन्हा पूरस्थिती, चंद्रभागा नदीवरील पूल अन् मंदिर पाण्याखाली
पंढरपुरात पुन्हा पूरस्थिती, चंद्रभागा नदीवरील पूल अन् मंदिर पाण्याखाली.
जाऊ दे मरू दे तिला तू कशाला..मनसे नेत्याकडून आव्हाडांची ती क्लिप ट्वीट
जाऊ दे मरू दे तिला तू कशाला..मनसे नेत्याकडून आव्हाडांची ती क्लिप ट्वीट.
शिंदे गटातील नेत्याच्या 'त्या' वक्तव्यावर अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
शिंदे गटातील नेत्याच्या 'त्या' वक्तव्यावर अमृता फडणवीस काय म्हणाल्या?.
मग नैतिकतेच्या ढोंगी गप्पा.., महिला अत्याचारावरून राऊतांची भाजपवर टीका
मग नैतिकतेच्या ढोंगी गप्पा.., महिला अत्याचारावरून राऊतांची भाजपवर टीका.
निवडणुकीपूर्वी रोहित पवारांना धक्का,आरोप करत ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा
निवडणुकीपूर्वी रोहित पवारांना धक्का,आरोप करत ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा.
नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाणांचं वयाच्या 64 व्या वर्षी निधन
नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाणांचं वयाच्या 64 व्या वर्षी निधन.