Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट; सरकारने केली अजून मोठी घोषणा, काय मिळणार दिलासा

Ladki Bahin Yojana Deadline : लाडकी बहीण योजनेची महत्वाची अपडेट समोर आली आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे लवकर हाती न आलेल्या राज्यातील महिलांना सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने याविषयीचे संकेत दिले आहेत. लवकरच याविषयीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्वाची अपडेट; सरकारने केली अजून मोठी घोषणा, काय मिळणार दिलासा
लाडकी बहीण योजनेत मोठी घोषणा, मुदतवाढीविषयी काय अपडेट
Follow us
| Updated on: Aug 25, 2024 | 10:13 AM

लाडकी बहीण योजनेत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या योजनेच्या कागदपत्रांसाठी महिलांना मोठी कसरत करावी लागली. अनेकांचे बँकेत खाते नव्हते. उत्पन्नाचा दाखला, आधार लिंक अशा अनेक गोष्टींसाठी महिलांना बराच वेळ लागला. राज्यातील अनेक महिलांचे अर्ज अजूनही प्राप्त होत आहे. तर काहींना अर्ज भरण्यास वीज, इंटरनेट, गर्दी यामुळे वेळ लागत आहे. 31 ऑगस्टपर्यंत योजनेची मुदत आहे. पण आता सरकारने अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवण्याविषयी महत्वाचे संकेत दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांचे काय संकेत

यवतमाळ येथे शनिवार लाडकी बहीण योजनेविषयीचा कार्यक्रम झाला. त्यात अजितदादा यांनी विरोधकांवर या योजनेचा अपप्रचार करत असल्याचा हल्लाबोल केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण विरोधकांचा समाचार घेतला. आमचे विरोधक योजना बंद कसे करता येईल ते पाहत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

लाडकी बहीण योजनेचा फायदा 10 टक्के महिलांना होणार नाही, असा विरोधक खोटा प्रचार करत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. या योजनेच्या लाभापासून कुठल्याही बहिणीला वंचीत ठेवण्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मोठे संकेत दिले. योजनेत शेवटचा अर्ज येईपर्यंत अन् सप्टेंबर महिन्यातसुद्धा लाभ देणार आहोत असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या योजनेची मुदत वाढवण्याचा संकेत त्यांनी दिला.

योजनेसाठी २ कोटी अर्ज

राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जवळपास २ कोटी अर्ज आल्याची माहिती समोर आली आहे. ऑगस्ट अखेरीस अर्जाची अडीच कोटी इतकी संख्या होण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार योजनेची मुदत वाढवण्याची शक्यता आहे. जवळपास १. ६० कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. मात्र आणखी अर्ज येण्याची शक्यता आहे त्यामुळ मुदत वाढ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे ज्या महिलांना बँक खाते उघडायला वेळ लागला. उत्पन्नाचा दाखला मिळाला नाही. ज्यांचा यापूर्वीचा अर्ज बाद झाला वा इतर कारणांमुळे ज्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही. त्यांना दिलासा मिळणार आहे.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.