लाडकी बहीण योजनेसाठी एक कोटी खात्यांमध्ये पाठवला एक रुपया, परंतु 15 लाख खात्यांमध्ये…
Ladki Bahin Yojana 1st Installment : महिला आणि बाल कल्याण विभागाने केलेल्या तांत्रिक तपासणीत अनेक महिलांच्या खात्यात एक रुपया पोहचला नाही. महिला आणि बालकल्याण विभागाकडून अशा खातेधारकांशी संपर्क साधण्यात येत आहेत. या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Ladki Bahin Yojana 1st Installment : राज्य सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानंतर पात्र झालेल्या अर्जांची तीन शिफ्टमध्ये छाननी करण्यात येत आहे. तसेच पात्र ठरलेल्या अर्जांच्या बँक खात्यांची तांत्रिक पडताळणी करण्यात आली. राज्यातील पात्र ठरलेल्या एक कोटी महिला खातेदारांच्या खात्यात महिला व बाल विकास विभागाकडून १ रुपया पाठवून रंगीत तालीम घेण्यात आली. परंतु एक कोटी लाभार्थ्यांपैकी जवळपास १५ ते १६ लाख महिलांच्या खात्यांमध्ये पैसे पोहचले नाही. आता त्या खात्यांमध्ये पैसे का आले नाही? याची तपासणी करुन त्या चुका दुरुस्त करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाच्या बुधावारी झालेल्या बैठकीत पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचे पहिले दोन हप्ते १७ ऑगस्ट रोजी देण्याचा निर्णय झाला.
त्या खात्यांमध्ये काय आढळल्या चुका
महिला आणि बाल कल्याण विभागाने केलेल्या तांत्रिक तपासणीत अनेक महिलांच्या खात्यात एक रुपया पोहचला नाही. त्या महिलांनी अर्जात बँक खाते चुकीचे दिले आहेत का? त्यांचे बँक खाते बंद तर झाले नाही? खात्याचा एखादा अंक चुकला का? अर्ज दोन वेळा केले गेले का? किंवा आणखी काय कारणे यामागे आहे, त्याचा शोध घेऊन त्यात दुरुस्ती-सुधारणा करण्यात येत आहेत. महिला आणि बालकल्याण विभागाकडून अशा खातेधारकांशी संपर्क साधण्यात येत आहेत. या त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुण्यातील सर्वाधिक अर्ज
लाडकी बहीण योजनेसाठी राज्यभरातून आतापर्यंत एकूण १.४५ कोटी महिलांचे अर्ज आले आहेत. त्यात सर्वाधिक अर्ज पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक ९.७२ लाख अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑगस्ट अखेरपर्यंत सुरु राहणार आहे.
कधी जमा होणार पैसे
लाडकी बहीण योजनेचे पैसे येत्या १७ ऑगस्ट रोजी जमा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे जमा होणार आहे. यामुळे राज्यभरातील पात्र महिलांना रक्षबंधणापूर्वी तीन हजार रुपये मिळणार आहे. या दिवशी राज्य सरकारकडून भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.