‘आधी एक रुपया आला, आणि आता….’, लाभार्थी महिलेची Tv9 ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पहिली लाभार्थी महिला ही मुंबईची महिला ठरली आहे. या महिलेने 'टीव्ही 9 मराठी'ला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया दिली. या महिलेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

'आधी एक रुपया आला, आणि आता....', लाभार्थी महिलेची Tv9 ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Follow us
| Updated on: Aug 14, 2024 | 9:00 PM

रुतिक गणकवार, Tv9 प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता आता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे दोन महिन्यांचे पैसे जमा होत आहेत. मुंबईतील एक महिला या लाडकी बहीण योजनेची पहिली लाभार्थी ठरली आहे. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असणाऱ्या वरळी येथे वास्तव्यास असणारी महिला ही लाडकी बहीण योजनेची राज्यातील पहिली लाभार्थी महिला ठरली आहे. या महिलेच्या बँक खात्यात याआधी 8 ऑगस्टला एक रुपया आला होता. यानंतर आज योजनेचा पहिला हफ्ता आला आहे.

मुंबईतील लाभार्थी महिलेने ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. “माझ्या मुलाने आधी मोबाईलवर फॉर्म भरला. यानंतर मी पत्रावर सही केली. त्यानंतर मला एक रुपया आला. त्यानंतर मला डायरेक्ट पैसे आले. मी मुख्यमंत्र्यांची आभारी आहे. मला खूप आनंज वाटत आहे”, अशी प्रतिक्रिया मुंबईतील पहिल्या लाभार्थी महिलेने दिली.

या महिलेच्या मुलानेदेखील प्रतिक्रिया दिली. “दोन महिने असंच सुरु होतं. फोटो अपलोड करताना प्रोब्लेम आला. हेही वाटलं की होईल की नाही. अखेर ते अप्रू झालं. आधी 9 तारखेला 1 रुपया आला. यानंतर आज 14 ऑगस्टला 3 हजार रुपये जमा झाले आहेत”, अशी माहिती लाभार्थी महिलेच्या मुलाने दिली.

विधानसभेच्या आधी सरकारकडून मोठी योजना जाहीर

विधानसभा निवडणूक दोन महिन्यांनी जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या आधी राज्य सरकारकडून अतिशय महत्त्वकांक्षी अशी ही लाडकी बहीण योजना जाहीर झाली आहे. या योजनेतून अडीच लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होणार आहेत.

मुख्यमंत्री काय म्हणाले?

राज्यातील विविध भागांमधील काही महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “सध्या चेकींग सुरू आहे. त्यामुळे मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे टाकण्यात आले आहेत. 17 तारखेला पैसे ट्रान्स्फर करताना कोणत्याही अडचणी येऊ नयेत म्हणून आम्ही खबरदारी घेत आहोत. उद्या 17 तारखेला तांत्रिक अडचणीमुळे खात्यात पैसे गेले नाही तर तुम्हीच बोंब माराल. त्यामुळे आम्ही आजच हे पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. ही ट्रायल रन सुरू असल्याने मोजक्याच महिलांच्या खात्यात पैसे आले आहेत”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.