tauktae cyclone: कुठे घरांच्या छत कोसळल्या तर कुठे झाडे पडली; महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत दाणादाण

काल आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत तडाखा बसला आहे. (Landfall process complete, power supply, mobile networks in Gujarat, Maharashtra hit)

tauktae cyclone: कुठे घरांच्या छत कोसळल्या तर कुठे झाडे पडली; महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत दाणादाण
tauktae cyclone
Follow us
| Updated on: May 18, 2021 | 10:45 AM

मुंबई: काल आलेल्या तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत तडाखा बसला आहे. प्रचंड वारा आणि जोरदार पाऊस यामुळे अनेक ठिकाणी घरांची, झाडांची पडझड झाली. वादळामुळे तर काही ठिकाणी भिंती खचल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात काल दुपारपासून ते आज पहाटे पर्यंत वीज गायब होती. त्यामुळे येथील नागरिकांना अख्खी रात्र अंधारात काढावी लागली. (Landfall process complete, power supply, mobile networks in Gujarat, Maharashtra hit)

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईत अनेक ठिकाणी जोरदार पावासमुळे पाणी भरले. तर ठाणे जिल्ह्यात काल दिवसभर वीज गेली होती. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. अनेक ठिकाणी मोबाईल नेटवर्क्सही मिळत नव्हते. त्यामुळे लोक प्रचंड वैतागले होते. काही भागात तर घरांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला.

काय घडलं काल दिवसभरात

>> सोमवारी रात्री उशिरा गुजरातच्या किनारपट्टी भागात तौक्ते वादळ पोहोचलं. यावेळी ताशी 185 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

>> अरबी समुद्रातून आलेल्या या वादळामुळे मुंबईत तांडव निर्माण झालं होतं. गुजरातला जाणाऱ्या दोन बोटी बेपत्ता झाल्या. त्यात 410 प्रवासी होते. या बोटी शोधण्याचं काम नाविक दल करत आहे.

>> मुंबईत तौक्तेमुळे 6 लोकांचा मृत्यू झाला असून 9 लोक जखमी झाले आहेत. काल मुंबईत ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते.

>> कुलाब्यात सर्वाधिक ताशी 108 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले.

>> प्रचंड हवेमुळे मुंबईत ठिकठिकाणी झाडे कोसळले आहेत. रस्त्यावर आणि सोसायट्यांच्या आवारातही वृक्ष उन्मळून पडल्याने पालिकेचे कर्मचारी हे वृक्ष हटवण्याचं काम करत आहेत.

>> वादळामुळे मुंबईतील खार येथे होर्डिंग्ज कोसळल्या. अनेक ठिकाणी पाणी भरले. त्यामुले अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली आहे.

>> काल मुंबईत लोकल, विमान आणि मोनोरेल्वेही बंद ठेवण्यात आली होती. वांद्रे-वरळी सी-लिंकही बंद ठेवण्यात आला होता.

>> वादळामध्ये सापडलेल्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर एनडीआरएफची टीम तैनात ठेवण्यात आली आहे.

>> वादळामुळे मुंबईतील विविध कोविड सेंटरमधील 600 कोरोना रुग्णांना इतरत्र शिफ्ट करण्यात आलं आहे.

>> मुंबईप्रमाणेच वडोदरामध्येही कोविड सेंटरमधील 70 रुग्णांना इतर रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं आहे.

>> गुजरातच्या सोमनाथमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. सोमनाथहून दीवला जाणारा रस्ता बंद करण्यात आला आहे. हा रस्ता उघडण्याचे काम सुरू आहे.

>> दीवमध्ये वादळाने संपूर्ण दाणादाण उडवली आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडली आहेत. रस्त्यावर कचरा साचला आहे. रस्त्यावर पाणी भरल्याने अनेक ठिकाणचे रस्ते बंद करण्यात आले असून साफसफाईचे काम सुरू आहे. (Landfall process complete, power supply, mobile networks in Gujarat, Maharashtra hit)

संबंधित बातम्या:

VIDEO | तौक्ते चक्रीवादळाचा कहर, मुंबईत झाड कोसळताना महिला धावली आणि…

Cyclone Tauktae Tracker And Live Updates | समुद्रात 4 जहाजांवर 700 जण अडकले, 146 जणांना वाचवण्यात यश

तौक्ते चक्रीवादळचा तडाखा, वानखेडे स्टेडियमची अशी झाली अवस्था, फोटो व्हायरल

(Landfall process complete, power supply, mobile networks in Gujarat, Maharashtra hit)

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.