मुंबई: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातील एक गूढ संपत नाही तोच दुसरं गूढ निर्माण होत असल्याने तपास यंत्रणाही चक्रावून गेली आहे. आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार हिरेन यांच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन्स वसई गावात होते. त्यामुळे हिरेन ठाण्यावरून वसईत कशासाठी गेले होते? तिथे ते कुणाला भेटले? भेटलेल्या व्यक्तींशी काय चर्चा केली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. (Last Location Of Mansukh Hiren Mobile In Vasai, Mystery Grew)
ठाणे पोलिसांनी मनसुख हिरेन यांच्या मोबाईलचे लास्ट लोकेशन शोधून काढले आहे. त्यानुसार बुधवारी रात्री साडे दहा वाजता ते वसईतील एका गावात असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे हिरेन वसईत कोणत्या गावात गेले? कशासाठी गेले होते? तिथे ते कुणाला भेटले? भेटलेल्या व्यक्तींशी काय चर्चा केली? असे सवाल केले जात असून याबाबतचं गूढ आणखीनच वाढलं आहे. दरम्यान, पोलिसांनी या दिशेनेही तपास सुरू केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल
मनसुख यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात करण्यात आले. काल रात्री उशिरापर्यंत हे पोस्ट मार्टम सुरु होते. चार डॉक्टरांच्या टीमने मिळून हे पोस्टमार्टम केलं. या पोस्ट मार्टमचे चित्रीकरण देखील करण्यात आले. मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा अहवाल घेऊन सहाय्यक उपायुक्त अविनाश अंबुरे हिरेन यांच्या घरी दाखल झाले. यानंतर अविनाश अंबुरे यांच्याकडून हिरेन कुटुंबियाना अहवाल दाखवण्यात आला.
मनसुख हिरेन यांचा मृत्यू 12 ते 14 तासांपूर्वी झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालाद्वारे स्पष्ट झाला आहे. पण त्यांचा मृत्यू नेमकं कोणत्या कारणामुळे झाला, हे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोणताही घातपात झालेला नाही. तसेच मनसुख यांच्या शरीरावर कोणतीही बाह्य जखम नाही. तसेच कुठलाही फाऊल प्लेबाबत रिपोर्ट नाही, असे यात नमूद करण्यात आलं आहे.
तपास एटीएसकडे
मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास ATS कडे देण्याचा निर्णय गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी जाहीर केला आहे. विधिमंडळाचं कामकाज संपल्यानंतर गृहमंत्री देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना हा मोठा निर्णय जाहीर केला. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा तपास एनआयएकडे द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षाने आज सभागृहात केली होती. याविषयावरुन सभागृहात चर्चाही पार पडली तसंच गृहमंत्र्यांनी निवेदनही दिलं. त्यानंतर आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचा तपास ATS देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. नुकतंच गृहमंत्रालयाकडून याबाबतचं पत्र जारी करण्यात आलं आहे. पण क्राईम ब्रांचच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तपास गुन्हा एनआयएकडे दिला जाणार असल्याचं म्हटलं जातं आहे. यामुळे आता एनआयएकडेच तपासासाठी कागदपत्रे देण्यात तयारी करण्यात येत आहे. (Last Location Of Mansukh Hiren Mobile In Vasai, Mystery Grew)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/EqmNZS3UMz
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 5, 2021
संबंधित बातम्या:
मृतदेह सापडला, शवविच्छेदन ते अंत्यसंस्कार, दिवसभरात काय काय घडलं?
मनसुख हिरेन यांच्या डोळ्यावर, पाठीवर जखमा, मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता
(Last Location Of Mansukh Hiren Mobile In Vasai, Mystery Grew)