AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lata Mangeshkar health update : लतादीदींची प्रकृती बिघडली, राज ठाकरे ब्रीच कँडीकडे रवाना

मुंबई: गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. लतादीदींची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही तातडीने ब्रीच कँडीत धाव घेतली असून डॉक्टरांकडून लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत.

Lata Mangeshkar health update : लतादीदींची प्रकृती बिघडली, राज ठाकरे ब्रीच कँडीकडे रवाना
लतादीदींची प्रकृती बिघडली, राज ठाकरे ब्रीच कँडीत दाखल
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 5:13 PM

मुंबई: गानसम्राज्ञी आणि भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर डॉक्टरांकडून तातडीने उपचार केले जात आहेत. लतादीदींची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनीही तातडीने ब्रीच कँडीत (Breach candy hospital) धाव घेतली असून डॉक्टरांकडून लतादीदींच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. तसेच मंगशेकर कुटुंबीयांशीही संवाद साधून राज हे लतादीदींच्या प्रकृतीची माहिती घेत आहेत. मंगेशकर कुटुंबीयांशी कौटुंबिक संबंध असणाऱ्यांनीही ब्रीच कँडी रुग्णालयात धाव घेतली आहे. मात्र, मंगेशकर कुटुंबीय आणि मंगेशकर कुटुंबीयांशी संबंधितांनाच रुग्णालयात सोडण्यात येत आहे. इतर कुणालाही प्रवेश दिला जात नाही.

लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळताच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब्रीच कँडी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी डॉक्टरांची भेट घेऊन लतादीदींच्या प्रकृतीबाबतची माहिती घेतली. तसेच मंगेशकर कुटुंबीयांचीही भेट घेऊन माहिती घेतली. लता मंगेशकर या गेल्या 27 दिवसांपासून ब्रीच कँडीत उपचार घेत आहेत. त्यांना न्यूमोनिया झाला होता. शिवाय कोरोनाची लागणही झाली होती. अनेक दिवस त्यांना व्हेंटिलेटरवरही ठेवण्यात आलं होतं. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर दोन दिवसांपूर्वी त्यांचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं होतं. मात्र, आज सकाळी पुन्हा त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे चिंता वाढली आहे.

व्हेंटिलेटर हटवला होता

गेल्या 27 दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर ब्रीच कँडीत उपचार सुरू आहे. त्यांनी उपचारांना प्रतिसादही द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं होतं. त्यामुळे त्या लवकरच घरी परततील असं सांगितलं जात होतं. मात्र, आज अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने चिंता वाढली आहे.

न्यूमोनियावर मात

लतादीदींना न्यूमोनिया झाला होता. त्यावर त्यांनी मातही केली होती. मात्र, कोरोनामुळे त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवून होते. मात्र, जुन्या आजारामुळे औषधांचा किती परिणाम होईल याबाबत डॉक्टरांनी साशंकता व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या:

Lata Mangeshkar health update : लता मंगेशकरांची प्रकृती बिघडली, श्वास घेण्यास त्रास, व्हेंटिलेटरवर ठेवले

कॉमेडीचं टीव्हीवर सोडू, राजकिय सामाजिक काम करत राहू; अमृता फडणवीसांच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर यांची प्रकृती गंभीर, व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवलं,डॉक्टरांची माहिती

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.