Mumbai Corona Update | मुंबईत महाभयंकर रुग्णवाढ, नवे रुग्ण 10 हजाराच्या पार, मुंबईचे आकडे धडकी भरवणारे!
मुंबईत तब्बल 10 हजार पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आहेल आहे. तर 654 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई रुग्णवाढीचा वेग आता पाचव्या गिअरमध्ये असल्याचं आजच्या आकडेवारीवरुन दिसून आलं आहे. मुंबईत तब्बल 10 हजार पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळून आहेल आहे. तर 654 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 92 टक्के असून सध्याच्या घडीला वाढलेल्या सक्रिय रुग्णसंख्येनं चिंतेत भर पडली आहे. 47 हजार 476 सक्रिय रुग्ण एकट्या मुंबईत असल्याचं आजच्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे.
आजची आकडेवारी?
मंगळवारी (4 जानेवारी) रोजी बीएमसीनं दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत नव्या 10860 रुग्णांची भर पडली आहे. तर 654 रुग्ण दिवसभरात बरे झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत एकूण 7,52,012 इतके रुग्ण बरे झाले असून मुंबईचा रिकव्हरी रेट हा 92% इतका नोंदवण्यात आला आहे.
सध्याच्या घडीला मुंबईतील सक्रिय रुग्णसंख्या ही झपाट्यानं वाढत असल्याचं दिसून आलं आहे. आज मुंबईत 47476 इतके सक्रिय रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा 110 इतका झाला आहे.
#CoronavirusUpdates 4th January, 6:00pm
Positive Pts. (24 hrs) – 10860 Discharged Pts. (24 hrs) – 654
Total Recovered Pts. – 7,52,012
Overall Recovery Rate – 92%
Total Active Pts. – 47476
Doubling Rate – 110 Days Growth Rate (28 Dec – 3Jan)- 0.63%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 4, 2022
उद्या निर्बंध अधिक कडक होणार?
दरम्यान, मुंबईत उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, या बैठकीत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या अनुशंगानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये शाळांबाबतचा निर्णय कालच घेण्यात आला होता. त्यानंतर आता महाविद्यालयांबाबतही उद्या निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. उद्याच्या बैठकीत राज्य सरकार काय नवी नियमावली जारी करतं, हे पाहणं महत्त्वाचंय.
ओमिक्रॉनचा वाढता प्रादूर्भाव आणि रुग्णवाढीच्या वाढलेल्या वेगानं सर्वच यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाल्या आहेत. एकूणच नवे नियम, निर्बंध जारी करुनही गर्दी कमी होत नसल्यामुळे आता राज्य सरकार उद्या होणाऱ्या बैठकीत नेमके काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचंय.
मुंबईच्या लॉकडाऊनबाबत काय?
महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय की,
ओमिक्रॉनला घाबरू नका. मात्र, सारे चिंताजनक आहे. लॉकडाऊन असताच कामा नये. आत्ता सगळे सावरतायत. लॉकडाऊनमुळे सर्वांचे कंबरडे मोडले आहे. आपण प्रत्येकाने ठरवले तर लॉकडाऊन टाळता येईल. गर्दी करणार नाही, गर्दीत जाणार नाही, असा निर्धार करा. घरातील सर्वांचे लसीकरण करा. मास्क काढणार नाही. बसमध्ये काय सगळीकडेच नियम पाळेन. मास्क न लावता फिरणार नाही. आपल्यामुळे इतरांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घ्या. शिवाय 20 हजारांचा आकडा क्रॉस झाला, तर केंद्राच्या नियमानुसार राज्य सरकार आणि महापालिका या नियमांची पूर्तता करेल.
याचाच आजच्या पेक्षा दुप्पट रुग्ण जर आढळले, तर लॉकडाऊनसारखा निर्णय पुन्हा घेतला जाऊ शकतो, असंही काही जणकारांचं म्हणणंय. त्यामुळे वेळीच धोका ओळखून मुंबईतील जनतेनं खबरदारी घ्यावी, अशी सूचना महापौरांनी केली आहे.
पाहा व्हिडीओ –
इतर बातम्या –
राज ठाकरे यांच्याकडून आगामी 10 दिवसांमधील कार्यक्रम रद्द, सुरक्षा ताफ्यातील एकाला कोरोना